Friday, November 14, 2025 07:38:28 AM

'मी आजपासून मुक्त झालो...'; घटस्फोटानंतर पतीने 40 लिटर दुधाने केली आंघोळ

या घटनेचा व्हिडिओ देखील त्याने रेकॉर्ड केला आहे. माणिक अलीच्या पत्नीने विवाहबाह्य संबंधांमुळे दोनदा घर सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

मी आजपासून मुक्त झालो घटस्फोटानंतर पतीने 40 लिटर दुधाने केली आंघोळ
Assam Man Celebrates Divorce
Edited Image

Assam Man Celebrates Divorce: आसाममध्ये पती-पत्नीच्या घटस्फोटाबाबत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील नलबारी जिल्ह्यात, माणिक अली नावाच्या एका व्यक्तीने घटस्फोटानंतरचे स्वातंत्र्य साजरे करण्यास सुरुवात केली. आनंद साजरा करण्यासाठी, त्याने दुधाने आंघोळ केली. या घटनेचा व्हिडिओ देखील त्याने रेकॉर्ड केला आहे. माणिक अलीच्या पत्नीने विवाहबाह्य संबंधांमुळे दोनदा घर सोडल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होणाऱ्या व्हिडिओमध्ये माणिक 'आजपासून मी मुक्त आहे' असे म्हणताना ऐकू येतो.

हेही वाचा - Shubhanshu Shukla: 18 दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

पती-पत्नीचा घटस्फोट - 

बरोलियापारा येथील रहिवासी माणिक अली यांनी दावा केला की त्यांची पत्नी दोनदा घरातून पळून गेली होती आणि दोन्ही वेळा त्यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीसाठी तिला घरी परत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अनिश्चिततेत जगणे शक्य नसल्याने, या जोडप्याने कायदेशीर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, जो काही दिवसांपूर्वी मंजूर झाला.

हेही वाचा - 10,000 मुलांचा बाप.. 700 किलो वजन.. वय 124! याच्यावर संशोधन करणंही झालंय कठीण.. काय आहे कारण?

40 लिटर दुधाने केली आंघोळ - 

माणिक अलीला अधिकृत घटस्फोट मिळाल्याची माहिती मिळताच, त्याने हा प्रसंग एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याने चार बादल्यांमध्ये 40 लिटर दूध गोळा केले आणि 'मी आजपासून मुक्त झालो', असं तो म्हणत तो दुधाने अंघोळ करताना दिसत आहे. 


सम्बन्धित सामग्री