ओडिशा : भारतातील सर्वात मोठी छापेमारी समोर आली आहे. ओडिशा राज्यात आयकर विभागाकडून 10 दिवस छापेमारी सुरू होती. या छापेमारीत दारू निर्मिती करणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी करण्यात आली. या छापेमारीच 352 कोटी रूपयांची मोठी रक्कम जप्त करण्यात आली. अधिक माहितीनुसार या छापेमारीबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. आयकर विभागाकडून केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा छापा मानला जात आहे.
छाप्या दरम्यान आयकर विभागाने जमीनीखाली दबलेल्या वस्तुंची ओळखण्यासाठी स्कॅनिंग मशीनचा वापर करण्यात आला. या कारवाई दरम्यान नोटा मोजण्यासाठी 36 नवीन मशीनची व्यवस्था करण्यात आली. एवढी मोठी रक्कम मिळल्यानंतर आयकर विभागाने विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. एवढ्या जास्त रक्कमेची मोजणी आणि सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची गरज पडली.
प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीनंतर जप्त केलेली रक्कम ट्रॅकवर लोड केले आणि कडक बंदोबस्तात आयकर विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले. या ऑपरेशनच्या यशानंतर आयकर विभागाची कुशलता आणि समर्पणाचे सर्वांकडून कौतुक करण्यात होतं आहे.
केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले होते. यामध्ये आयकर विभागाचे अन्वेषण संचालक एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता. हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक ठरला नाही, तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचेही यातून सिद्ध झाले. दरम्यान, आयकर विभागातील या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.