Australian Team ODI and T20 squads announced : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय (ODI) आणि पाच T20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची (IND vs AUS) घोषणा केली आहे. या दोन्ही सिरीजमध्ये मिचेल मार्श (Mitchell Marsh) संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने केवळ पहिल्या दोन T20 सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे. यापूर्वी बीसीसीआयने 4 ऑक्टोबरला भारतीय संघाचा स्क्वॉड जाहीर केला होता.
प्रमुख खेळाडूंना आराम, मॅक्सवेल दुखापतीमुळे बाहेर
या संघनिवडीत ऑस्ट्रेलियन निवड समितीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दुखापतीतून सावरत असलेल्या पॅट कमिन्सला संघातून आराम देण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोन हार्डी, मॅथ्यू कुह्नमैन आणि मार्नस लाबुशेन यांनाही टीममधून वगळण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मनगटाच्या फ्रॅक्चरमुळे (Wrist Fracture) ग्लेन मॅक्सवेलला T20 सिरीजमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. तसेच, विकेटकीपर एलेक्स कॅरी पहिली मॅच खेळू शकणार नाही, कारण तो त्यावेळी शेफील्ड शील्ड मॅच खेळत असेल.
हेही वाचा - Rohit Sharma Captaincy Controversy | 'या' तीन कारणांमुळे रोहित शर्माला गमवावं लागलं कर्णधारपद
मिडल ऑर्डरसाठी दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री
ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केले की, काही खेळाडूंना आगामी अॅशेस टेस्ट सिरीजसाठी शेफील्ड शील्डमध्ये खेळावे लागणार असल्याने कॅमरून ग्रीनला T20 टीममध्ये सामील केले नाही. मात्र, 2027 च्या वन-डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मिडल ऑर्डर (Middle Order) मजबूत करण्याच्या उद्देशाने मॅथ्यू रेनशॉ आणि मिचेल ओवेन या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. रेनशॉने देशांतर्गत 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो स्टीव स्मिथ आणि लाबुशेनप्रमाणे इनिंग सांभाळण्याची (Anchor Innings) भूमिका बजावू शकतो. तर, मिचेल ओवेन त्याच्या स्फोटक बॅटिंगसाठी (Explosive Batting) ओळखला जातो. त्याने मागील सीजनमध्ये 48 बॉलमध्ये शतक झळकावले होते आणि तो मॅक्सवेल आणि स्टोइनिसप्रमाणे फिनिशिंगची (Finishing) भूमिका पार पाडू शकतो.
टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वनडे स्कॉड -
मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, एलेक्स कैरी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, ॲडम जम्पा
टी-ट्वेंटीसाठी ऑस्ट्रेलियाचा स्कॉड -
मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेविड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ॲडम जम्पा
हेही वाचा - orld Para Athletics Championships 2025: भारताची 6 सुवर्ण, 9 रौप्य तर 7 कांस्य पदकांची कमाई; 22 पदकांसह सर्वोत्तम कामगिरी