IND vs SA Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका उद्या भिडणार; कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना

एकही सामना न गमावता दिमाखात सुपर 8 फेरी गाठल्यानंतर भारताचा पहिला सामना आता बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

IND vs SA Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका उद्या भिडणार; कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना

IND vs SA Super-8 Live Streaming: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 2026 च्या टी-20 विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिली आहे. एकही सामना न गमावता दिमाखात सुपर 8 फेरी गाठल्यानंतर भारताचा पहिला सामना आता बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे एडन मार्करामचा दक्षिण आफ्रिका संघदेखील या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून क्रिकेट चाहत्यांना एका चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे.

सामन्याची वेळ आणि ठिकाण
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सुपर 8 सामना रविवार, 22 फेब्रूवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मीदी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल, तर टॉस (फेक) अर्धा तास आधी म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता होईल.

लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंगची माहिती
भारतीय चाहत्यांना या सामन्याचा आनंद विविध माध्यमांतून घेता येईल. टीव्हीवर हा सामना Star Sports Network वर थेट प्रसारित केला जाणार आहे. ज्या प्रेक्षकांना मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहायचा आहे, त्यांच्यासाठी JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपणाची (Live Streaming) सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; सराव सत्रात 'हा' खेळाडू जखमी

IND vs SA: दोन्ही संघांतील खेळाडू 
भारत: इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्टजे, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number