पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवेळी मोठी असते. अशाच सर्व प्रवाशांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिलेली आहे. दिवाळी आणि छठ या महत्त्वाच्या सणांना होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुण्यातून तब्बल 450 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पुण्यातून कोणत्या मार्गांवर धावणार गाड्या?
पुणे ते दानापूर या मार्गावर सर्वाधिक 63 फेऱ्या सोडल्या जाणार आहे. गाडी क्रमांक 01449 ही गाडी दररोज दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पुण्यातून सुटणार, तर परतीची गाडी क्रमांक 01450 ही दानापूरहून पहाटे 5 वाजता निघेल, अशी माहिती समोर आलेली आहे. याशिवाय पुणे-अमरावतीच्या 7 फेऱ्या होणार असून पुणे-मुझफ्परपूरच्या देखील 6 फेऱ्या असतील.
विशेष रेल्वे फेऱ्या कधी धावणार?
मिळालेल्या माहितीनुसार, अजून चार दिवसांनंतर अर्थात 1 नोव्हेंबरपासून पुणे, हडपसर आणि खडकी या तिनही स्थानकांवरुन या विशेष गाड्या धावणार आहे. याचा सर्वाधिक फायदा बिहार, उत्तर प्रदेश शिवाय मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या असंख्य प्रवाशांना होणार आहे.
सर्वाधिक रेल्वेगाड्या आता याच ठिकाणाहून
गोरखपूरसाठी हडपसरहून तब्बल 32 फेऱ्या ठरवण्यात आलेल्या आहेत. गाडी क्रमांक 01415 ही गाडी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. शिवाय हडपसर-नागपूरसाठी 15 फेऱ्या असतील, गाझीपूर सिटीच्या 12 फेऱ्या आणि प्रयाजराजसाठी 5 फेऱ्या असणार आहेत.
खडकीतून ‘या’ एक्सप्रेस सुटणार
खडकी या स्थानकातून हजरत निजामुद्दीनसाठी 14 आणि खडकी-सांगानेरसाठी 6 विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत, जी एक्स्प्रेस सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांनी तिकीट बुक करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहान रेल्वेने केले आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update