ऐन सणासुदीत विमान प्रवास महागणार! इंडिगोकडून तिकीट दरात मोठी वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू; प्रवासाच्या खर्चात किती वाढ?

देशातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने विमान तिकिटांवरील इंधन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
IndiGo Flight Fare Hike
IndiGo Flight Fare Hike

सणासुदीच्या काळात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या मागणीत मोठी वाढ होत असते. परदेशात नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त राहणारे अनेक भारतीय दिवाळी, दसरा आणि इतर सणांच्या निमित्ताने मायदेशी परतण्याचे नियोजन करतात. तर देशातील नागरिकही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळांना भेट देण्यास प्राधान्य देतात. मात्र यंदा विमान प्रवाशांच्या या आनंदावर अतिरिक्त खर्चाचे सावट आले आहे.

देशातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने विमान तिकिटांवरील इंधन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. इंडिगोने 6 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12.01 नंतरच्या नवीन बुकिंगला सुधारित शुल्क लागू केले आहेत. त्यानुसार देशांतर्गत प्रवासासाठी प्रवासाच्या टप्प्यांनुसार 100 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत वाढ तर कमी अंतराच्या प्रवासासाठी 100 रुपये तर दूरच्या अंतरासाठी प्रवाशांना 350 रुपयांपर्यंत जास्त मोजावे लागतील. हे दर विमानाने पार केलेल्या अंतरानुसार अतिरिक्त इंधन शुल्क म्हणून आकारले जातील.

हेही वाचा- दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे दर

तर आंतरराष्ट्रीय विमानांच्या सरचार्जमध्ये हे दर विविध क्षेत्रांनुसार वेगवेगळे आहेत. सार्क क्षेत्रातील विमानांसाठीचे शुल्क 1,000 रुपयांवरून 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तर युरोपला जाणाऱ्या विमानांसाठी इंधन शुल्क 10,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. ATF अर्थात विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे.

यावेळी मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले आहे. त्यामुळे जेट फ्युएलच्या किमतीत 14 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. हे दर गेल्या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. प्रवाशांवरील आर्थिक भार कमी ठेवण्यासाठी मर्यादित स्वरूपात शुल्कवाढ केल्याचा दावा इंडिगोने केला आहे. तसेच या वाढत्या इंधन खर्चाचा थेट फटका विमान कंपन्यांना बसत असल्याने इंडिगोने हा निर्णय घेतला आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात इंडिगोने केलेल्या या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला आता मोठा कात्री लागण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version