Wednesday, November 13, 2024 05:03:35 PM

Iran attacks Israel
इराणचा इस्रायलवर हल्ला

इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष पेटत असताना जागतिक नेतृत्वाचे डोळे विस्फारले आहेत.

इराणचा इस्रायलवर हल्ला

इराण : काही काळापूर्वी इराणकडून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायलच्या सैन्याने ही माहिती दिली आहे. इस्रायलने त्यांच्या नागरिकांना संरक्षित वातावरण उपलब्ध करुन दिल्याचा भरवला दिला आहे. दरम्यान इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष पेटत असताना जागतिक नेतृत्वाचे डोळे विस्फारले आहेत.

इस्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं. पॅलेस्टाईनला धडा शिकवून इस्रायलने आपला मोर्चा इस्लामी राष्ट्रांकडे वळवला. त्यातच इराणविरोधात कठोर कारवाईची घोषणा इस्रायलने केली. यादरम्यानच खोमेनीनची इराणमधली जुलमी राजवट संपवणार असे वक्तव्य इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केले. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या या वक्तव्यामुळे इराण चिडला. इरणाने इस्रायलविरोधात क्षेपणास्त्र हल्ला सुरु केला.

 

 

 

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo