Monday, March 09, 2026 09:30:08 PM

Migrant Worker Death : काळीज चिरणारी घटना! सौदीतून 120 दिवसांनी आला लेकाचा मृतदेह, पण स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, कारण काय?

पोटच्या गोळ्याचा चेहरा शेवटचा पाहण्यासाठी आसुसलेल्या आई-वडिलांनी आणि पत्नीने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. या वेदनादायी निर्णयामागचे कारण काय आणि विजय यांचा दुर्दैवी शेवट कसा झाला जाणून घेऊ..

migrant worker death  काळीज चिरणारी घटना सौदीतून 120 दिवसांनी आला लेकाचा मृतदेह पण स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार कारण काय

Migrant Worker Death : झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात नियतीचा एक अत्यंत क्रूर खेळ पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियातील जेद्दा येथे रोजगारासाठी गेलेल्या विजय कुमार महतो यांचा मृतदेह तब्बल 120 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात परतला आहे. मात्र, पोटच्या गोळ्याचा चेहरा शेवटचा पाहण्यासाठी आसुसलेल्या आई-वडिलांनी आणि पत्नीने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. या वेदनादायी निर्णयामागचे कारण काय आणि विजय यांचा दुर्दैवी शेवट कसा झाला जाणून घेऊ..

जेद्दातील त्या 'क्रॉसफायर'ने घातला घाला
मूळचे गिरिडीह जिल्ह्यातील डुमरी ब्लॉकचे रहिवासी असलेले 27 वर्षीय विजय कुमार महतो जेद्दा येथे एका ट्रान्समिशन लाईन प्रोजेक्टवर 'टॉवर लाईन फिटर' म्हणून काम करत होते. 15 ऑक्टोबर 2025 रोजी विजय आपल्या कामाच्या ठिकाणी असताना, स्थानिक पोलीस आणि एका गुन्हेगारी टोळीमध्ये भीषण चकमक सुरू झाली. या 'क्रॉसफायर'मध्ये विजय दुर्दैवाने अडकले आणि गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेह स्वीकारण्यास नकार देण्याचे कारण
विजय यांचा मृतदेह मुंबईमार्गे 14 फेब्रुवारी 2026 रोजी रांची विमानतळावर पोहोचला आणि तिथून तो रिम्स (RIMS) रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला. मात्र, त्यांचे मेहुणे राम प्रसाद महतो आणि वडिलांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांच्या या भूमिकेमागे काही ठोस कारणे आहेत:
भविष्यातील अंधार: विजय यांच्या पश्चात त्यांची पत्नी बसंती देवी, 7 आणि 5 वर्षांची दोन लहान मुले आणि वृद्ध आई-वडील आहेत.
कंपनीची उदासीनता: ज्या खाजगी कंपनीत विजय कामाला होते, त्या कंपनीने अद्याप नुकसानभरपाईबाबत कोणतेही लेखी आश्वासन दिलेले नाही.
लेखी आश्वासनाची मागणी: जोपर्यंत कंपनी मुलांच्या शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणासाठी लेखी नुकसानभरपाईचे पत्र देत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा कुटुंबाने घेतला आहे.

हेही वाचा - India America Trade: व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन; भारत-अमेरिका अंतरिम कराराचा मसुदा तयार; 'या' तारखेला होणार मोठी घोषणा

सरकारची भूमिका आणि तांत्रिक अडसर
झारखंड सरकारने मृत विजय यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, ही रक्कम कुटुंबाच्या भविष्यासाठी पुरेशी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. झारखंडच्या मायग्रंट कंट्रोल सेलच्या प्रमुख शिखा लाकडा यांनी स्पष्ट केले की, गोळीबाराचे प्रकरण असल्याने हे प्रकरण सध्या सौदीतील न्यायालयात सुरू आहे. अंतिम नुकसानभरपाई न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल. परदेशी कंपनीवर थेट दबाव आणण्यात राज्याच्या अधिकारांना मर्यादा येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कुटुंबाची आर्त साद
"आम्ही विजयवर खूप प्रेम करतो, पण त्याच्या निधनानंतर या कुटुंबाचे काय होणार? आम्हाला केवळ आश्वासन नको, तर ठोस आधार हवा आहे," अशी व्यथा राम प्रसाद महतो यांनी मांडली आहे. आपल्या हक्कासाठी हे कुटुंब आता डुमरी अनुमंडल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. एका बाजूला लाडक्या माणसाचा विरह आणि दुसऱ्या बाजूला मुलांच्या पोटाचा प्रश्न, अशा भीषण कात्रीत हे कुटुंब सध्या अडकले आहे.

हेही वाचा - Dwarka Crash Victim: 'माझा मुलगा तर गेला, पण ही चूक...'; 'त्या' अपघातानंतर रील बनवणाऱ्या अल्पवयीन चालकावर मृताच्या आईचा संताप


सम्बन्धित सामग्री