एआय, हवामान.. मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणारे 17 धोके! ‘लॅन्सेट’ने दिला गंभीर इशारा, पुढील काही वर्षांत सगळं…

मानवजातीपुढील ही संकटे केवळ एका देशापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगावर त्यांचा परिणाम होणार आहे. यासाठी जागतिक पातळीवर आत्तापासूनच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
AI Earth
AI Earth

Lancet Report 2026 Warns about Threats to Human Existence: हवामानातील नाट्यमय बदल आणि वेगाने वाढणारे वायू प्रदूषण यांसारख्या आव्हानांमुळे मानवी आरोग्यासमोर अभूतपूर्व संकटे उभी राहिली आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘द लॅन्सेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकाच्या एका नव्या आंतरराष्ट्रीय अहवालाने जागतिक आरोग्याला आणि मानवी अस्तित्वाला असलेल्या गंभीर धोक्यांबाबत इशारा दिला आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, 35 तज्ज्ञांच्या समितीने तयार केलेला हा महत्त्वाचा अहवाल जर्मनीतील बर्लिन येथे आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत सादर केला जात आहे.

पुढील 75 वर्षांतील 17 विनाशकारी आव्हाने
‘द लॅन्सेट’च्या अहवालात सन 2100 पर्यंत, म्हणजेच पुढील 75 वर्षांत मानवी आरोग्य आणि अस्तित्वावर गंडांतर आणू शकणाऱ्या 17 प्रमुख विनाशकारी धोक्यांची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा (AI) घातक वापर, अणुयुद्धाची शक्यता आणि जैविक शस्त्रांचा धोका यांमुळे संपूर्ण मानवजातीचा विनाश होऊ शकतो, असा अत्यंत गंभीर इशारा या अभ्यासातून देण्यात आला आहे.

मानवासमोरील प्रमुख 17 धोके कोणते?
तज्ज्ञांच्या मते, हे धोके टाळण्यासाठी जागतिक पातळीवर आत्तापासूनच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. अहवालात नमूद करण्यात आलेले मुख्य धोके म्हणजे:

– कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर, अणुयुद्ध आणि जैविक शस्त्रांचा वाढता धोका
– हवामान बदल, तीव्र वायू प्रदूषण आणि नैसर्गिक महामाऱ्यांचा उद्रेक
– बाल-कुपोषण, लठ्ठपणा आणि औषध-प्रतिकारशक्ती (Antimicrobial Resistance) कमी होणे
– उच्च रक्तदाब, मद्यपानाचा वाढता वापर आणि मानसिक आरोग्याच्या समस्या
– वाढती उत्पन्नातील असमानता, शिक्षणाचा अभाव, युद्धे आणि आंतरराष्ट्रीय मदतीतील घट

हेही वाचा – 1950 नंतरचा सर्वात भयानक ‘सुपर एल निनो’! शास्त्रज्ञांकडून जगभरात 4.5 लाख मृत्यूचा गंभीर धोका

जागतिक पातळीवर त्वरित उपायांची गरज
जरी यातील काही अत्यंत विनाशकारी घटना घडण्याची शक्यता कमी असली, तरी त्यांचा परिणाम संपूर्ण मानवी प्रजातीचा अंत करू शकतो. म्हणूनच आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न यांसारख्या मूलभूत घटकांमधील असमानता दूर करत जागतिक स्तरावर सहकार्य वाढवण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

मानवी अस्तित्वाचा रक्षणार्थ सामूहिक प्रयत्न
मानवजातीपुढील ही संकटे केवळ एका देशापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगावर त्यांचा परिणाम होणार आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये बदल करून, हवामान बदलावर नियंत्रण मिळवणे आणि एआयसारख्या तंत्रज्ञानाच्या गैरवापराला वेसण घालणे हे आगामी काळात मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल.

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं! भारतीय वंशाच्या नवी पिल्ले यांना मिळाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version