लाईट जाताच घात झाला! 500 मीटरपर्यंत ओढत नेलं; बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा बळी

Satara Leopard Attack News : साताऱ्यातील न्हाळेवाडी परिसरात वीजपुरवठा खंडित असताना बिबट्याने दोन वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला केला. बिबट्याने त्याला उसाच्या शेतात नेले
अंधाराचा फायदा घेत चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला
Leopard Attack in Satara

सातारा जिल्ह्यातून एक हृदय विळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे. शिवथर आणि मालगावमधील न्हाळेवाडी गावात बिबटयाने घराबाहेर खेळत असलेल्या अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे.संध्याकाळी साधारण साडेसातच्या सुमारासा लाईट गेली असल्याने सर्वत्र अंधार होता. यायाच फायदा घेत बिबट्याने चिमुकल्याला उचलून तब्बल 500 मीटरर्यंत उसाच्या शेतात ओढत नेले.

ग्रामस्थांनी आरडाओरड करत पाठलाग केल्यानंतर बिबट्याने चिमुकल्याला सोडले. मात्र गंभीर झालेल्या जखमांमुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा-शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाताना वाटेतच काळाचा घाला; रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

गेल्या तीन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असूनही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सध्या ग्रामस्थ करत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version