Thursday, November 13, 2025 07:09:56 AM

LIC New Scheme 2025 : एलआयसीच्या दोन नवीन योजना ठरणार महिलांसाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी लाभदायी

एलआयसीने दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नवीन जीएसटी राजवटींतर्गत एसआयसीच्या पहिल्या योजना आहेत.

lic new scheme 2025  एलआयसीच्या दोन नवीन योजना ठरणार महिलांसाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी लाभदायी

मुंबई: एलआयसीने दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. 'एलआयसी जन सुरक्षा योजना' आणि 'एलआयसी बीमा लक्ष्मी योजना'. या दोन्ही योजना नवीन जीएसटी राजवटींतर्गत एसआयसीच्या पहिल्या योजना आहेत. एलआयसीच्या मते, या योजनांचा उद्देश समाजातील विविध घटकांना आर्थिक सुरक्षिततेचा आधार देणे आहे. 

1 - एलआयसी जन सुरक्षा योजना (880): ही योजना कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही एक जीवन सूक्ष्म योजना असून नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड वैयक्तिक बचत योजना आहे. विशेष म्हणजे, या योजनेत दोन महत्त्वाचे फायदे आहेत, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत मिळते आणि पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळते.

या योजनेत गॅरंटीड अ‍ॅडिशन मिळतो, जो दरवर्षी भरलेल्या वार्षिक प्रीमियमच्या 4% दराने वाढतो. पॉलिसी घेण्यासाठी वय 18 ते 55 वर्षांदरम्यान असावे. तसेच, किमान विमा रक्कम 1 लाख रुपये, तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये आहे. सोबतच, पॉलिसीचा कालावधी 12 ते 20 वर्षांपर्यंत निवडता येतो, तर प्रीमियम भरण्याचा कालावधी त्यापेक्षा 5 वर्षांनी कमी असतो. तीन वर्षांसाठी पूर्ण प्रीमियम भरल्यानंतर ऑटो कव्हर सुविधा उपलब्ध होते. तसेच, एका वर्षानंतर पॉलिसी कर्जाची सुविधा देखील मिळते. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्यांसाठी ही योजना सुरक्षित बचतीचा आणि संरक्षणाचा उत्तम पर्याय ठरते.

हेही वाचा: New Nomination Rules: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! 1 नोव्हेंबरपासून नॉमिनी सिस्टममध्ये मोठा बदल

2 - एलआयसी बीमा लक्ष्मी योजना (881): ही योजना विशेषत: महिलांसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. ही योजना जीवन विमा, बचत आणि आरोग्य सुरक्षा यांची जुळणी करते. ही योजना नॉन-लिंक्ड असून, दर 2 ते 4 वर्षांनी निश्चित कालावधीत पैसे परत मिळतात. या योजनेत महिलांना तीन प्रकारचे जगण्याचे फायदे निवडण्याची मुभा आहे. किमान विमा रक्कम 2 लाख रुपये, तर जास्तीत जास्त मर्यादा एलआयसीच्या अंडररायटिंग पॉलिसीनुसार ठरवली जाईल. पॉलिसीची मुदत 25 वर्षे असून, प्रीमियम भरण्याचा कालावधी 7 ते 15 वर्षे निवडता येतो.

विशेष म्हणजे, या योजनेत महिलांसाठी क्रिटिकल इलनेस रायडरचा पर्याय आहे. तीन वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ऑटो कव्हर सुविधा मिळते. तसेच, वार्षिक प्रीमियमच्या 7% गॅरंटीड अ‍ॅडिशनचा लाभ मिळतो. एलआयसीच्या या दोन नव्या योजना समाजातील विविध स्तरातील लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.


सम्बन्धित सामग्री