पहिल्याच कॉमनवेल्थ गेम्समधील कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघाचा सदस्य असलेला चिपळूणच्या कोळकेवाडीचा सुपुत्र शुभम शिंदे मायभूमीत दाखल झाला आहे. त्याच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या वतीने चिपळूण ते कोळकेवाडी, अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही शुभमचे स्वागत केले
राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत दुष्काळी उपाययोजनांसाठी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बागडे यांनी आज मदतीचा धनादेश सुपूर्द केला. संभाजीनगर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, कर्जतसह पुण्यातही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. दिवसभराच्या उकाड्यानंतर पुणेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला. काही वेळासाठी पावसाने जोर धरल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ मंदावली होती.
रत्नागिरी जिल्ह्याला रविवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. चिपळूणमध्ये रात्री नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी भात कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापणीला आलेल्या भातशेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वातावरणात अचानक बदल होऊन ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत 34 इलेक्ट्रिक बसची भर पडणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे. या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या नंतर मराठवाड्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्या सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक क्रीडासुविधा, महानगरपालिकेचे पर्यावरणपूरक वाहतूक व ऊर्जा प्रकल्प तसेच शैक्षणिक सुविधांचा समावेश आहे.विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित कार्यक्रमात 400 मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) व युवा वसतिगृहाचे लोकार्पण होईल.
रायगडमधील कर्जत साई डोंगर परिसरात करण्यात आलेल्या टोरंट प्रकल्पासाठीची वृक्षतोडला वंचित बहुजन आघाडीकडून देखील विरोध करण्यात आला आहे. आज वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या परिसरात पाहणी करत सह्याद्रीची नासधूस करण्याचे काम सुरू असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय. सह्याद्री पश्चिम घाट हा इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने या परिसरात वृक्षांची कत्तल आणि धरणे बांधणे हे चुकीचं असून या परिसरात बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम झालं पाहिजे असे आंबेडकर म्हणाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहा जागांसाठी आज मतदान पार पडले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या सहा जागांसाठी 13 उमेदवार मैदानात होतें. बँकेच्या 21 जागांपैकी 15 जागा बिनविरोध झाल्यानंतर सहा जागांसाठी केवळ १३ उमेदवार मैदानात राहिले. प्रामुख्याने जत, तासगाव मधील सोसायटी गटातील लढती कड सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मत चोरी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये ज्याप्रकारे आंदोलन सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या बाहेर देखील विरोधी पक्षाने आंदोलन केले यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी तसेच ठाकरे यांचे शिवसेना माकप काँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले.
आष्टी तालुक्यातील आज रविवारी सायंकाळी 4 वाजाता हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडला. यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी झाले असून अजून पाऊस पडावा आशी भावना शेतकरी व्यक्त केली. सर्व जण आभाळाकडे लक्ष लावून बसले आहेत.
पालघर जिल्ह्यात कर्करोगाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुडण येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मानव सेवा सामाजिक संस्था, ग्रामपंचायत कुडण आणि साई सेवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात डॉ. रतन शेट्टी आणि डॉ. अमित गुप्ता यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
नांदेड जिल्ह्यापासून राज्याच्या आरोग्य संवादाची सुरुवात करत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील तसेच राज्यातील आरोग्य सेवा दर्जेदार व्हावी, याची सुरुवात आम्ही नांदेड जिल्ह्यापासून करत आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांशी संवाद साधत आहोत. बऱ्याच उणिवा आम्हाला समजत आहेत. त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. खूप पैसे आम्ही खर्च करतो आणि लोकांना त्याचा योग्य रिझल्ट मिळावा, अशी त्यांची अपेक्षा असणार आहे.
ऊसाला पाच हजार रुपये दर द्यावा यासाठी ऊसदर संघर्ष समितीचे गेले चार दिवसापासून कारखान्यांवर ठिय्या आंदोलन सुरू होते. माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल 3 हजार 150 रुपये जाहीर केली असून पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर 3 हजार 100 रूपये देणार आहे. त्यामुळे कारखानदार आणि ऊसदर संघर्ष समिती मधील संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.
रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या विनंतीला मान देत उपोषणकर्त्यांनी आंदोलन सोडले. उर्वरित तालुकेही काही दिवसांत दुष्काळग्रस्त घोषित होतील, असे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले. दरम्यान, मंत्री अदिती तटकरे यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यामुळे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सांगता झाली.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील देऊरवाडी येथील मोतीलाल ओसवाल फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या मजूर रवी संजय पत्रे यांच्या घराला लावलेले सील प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज तोडले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाला घरात प्रवेश मिळवून दिला. रवी संजय पत्रे यांनी घरासाठी मोतीलाल ओसवाल फायनान्सकडून कर्ज घेतले होते. कागदोपत्री 5 लाख 9 हजार रुपयांचे कर्ज दाखवण्यात आले. असताना प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यात केवळ 2 लाख 70 हजार रुपये जमा झाले.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाडी-शेवाडे मध्यम प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कालव्यांच्या कामांमधील भ्रष्टाचार, रखडलेले भूसंपादन आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाडी-शेवाडे प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने आजपासून धरणावर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
येवला शहर पोलिसांनी अवैध मद्य वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत येवला-नांदगाव रोडवरील वडगाव बल्हे शिवारात सुमारे 70 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.एका ओमनी कार या वाहनातून अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनात कॅनॉन, ग्रँड मास्टर, रॉयल ग्रीन, मॅकडॉवेल्स आदी ब्रँडचा मद्यसाठा आढळून आला.
आमदार राजु नवघरे सेवा प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षा 2026 आज वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सात वर्षांची परंपरा असलेल्या या मोफत परीक्षेसाठी 4 हजार 703 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, मात्र नांदेड, हिंगोलीसह आसपासच्या जिल्ह्यातून 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या हेतूने आमदार राजु नवघरे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
देवळीत एसएमडब्लू इस्पातच्यावतीने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कोटेश्वर धाम परिसरात आयोजित या अभियानात कंपनीचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी श्रमदानातून नदी व परिसराची स्वच्छता केलीय. माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमातून स्वच्छ नदी, सुंदर देवळी आणि निरोगी भविष्याचा संकल्प करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. 10 जागांसाठी 14 तालुक्यांतील 33 केंद्रांवर होणाऱ्या या प्रक्रियेत 3,837 मतदार मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही, व्हिडिओ शूटिंग आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आ
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायटी गटासाठी अत्यंत चूरशीने मतदान पार पडत आहेत. तासगावात एकूण 79 मतदारापैकी 78 मतदान झाले आहॆ. यातील 78 वा मतदार वसंत मोरे बिरणवाडी हे थेट व्हील चेअर वरून मतदानासाठी दाखल झाले. ते कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार घेत होतें मात्र मतदानासाठी त्यांना तासगाव मध्ये आणण्यात आले आणि व्हील चेअरच्या माध्यमातून ते मतदानासाठी केंद्रावर आले
कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याऐवजी परदेशातील आधुनिक वृक्ष पुनर्रोपण तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे विकासकामांसोबत पर्यावरणाचेही संरक्षण होईल आणि कर्जत तालुक्यात देशासाठी एक आदर्श प्रकल्प उभा राहू शकतो, अशी भूमिका भाजपचे कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुम्ही भारतीय संस्कृतीचा अपमान केला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहणाचा अनावरण देशाच्या राष्ट्रपतीन करणे हा खरंतर भारतीय रूढी परंपरा संस्कृतीचा सन्मान होय. विकास लवंडे स्वतःला वारकरी संप्रदायाचे पाईक समजतात मग भारतीय अध्यात्म रूढी परंपरेचे मारक कसे? असा सवाल भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला
आमदार राजु नवघरे सेवा प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षा २०२६ आज वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सात वर्षांची परंपरा असलेल्या या मोफत परीक्षेसाठी ४ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, मात्र नांदेड, हिंगोलीसह आसपासच्या जिल्ह्यातून ५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दाखल झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या हेतूने आमदार राजु नवघरे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.आयोजकांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत हा उपक्रम पुढेही सातत्याने असाच सुरु राहणार असल्याचे सांगितले.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे. १० जागांसाठी १४ तालुक्यांतील ३३ केंद्रांवर होणाऱ्या या प्रक्रियेत ३,८३७ मतदार मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही, व्हिडिओ शूटिंग आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याऐवजी परदेशातील आधुनिक वृक्ष पुनर्रोपण तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे विकासकामांसोबत पर्यावरणाचेही संरक्षण होईल आणि कर्जत तालुक्यात देशासाठी एक आदर्श प्रकल्प उभा राहू शकतो, अशी भूमिका भाजपचे कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायटी गटासाठी अत्यंत चूरशीने मतदान पार पडत आहेत. तासगावात एकूण 79 मतदारापैकी 78 मतदान झाले आहॆ. यातील 78 वा मतदार वसंत मोरे बिरणवाडी हे थेट व्हील चेअर वरून मतदानासाठी दाखल झाले. ते कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार घेत होतें मात्र मतदानासाठी त्यांना तासगाव मध्ये आणण्यात आले आणि व्हील चेअरच्या माध्यमातून ते मतदानासाठी केंद्रावर आले. आता फक्त एकच मतदान राहिले असून अमित पाटील यांचे एक मतदान या गटासाठी राहिले आहॆ. त्यामुळे अमित पाटील यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा थांबली आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे. १० जागांसाठी १४ तालुक्यांतील ३३ केंद्रांवर होणाऱ्या या प्रक्रियेत ३,८३७ मतदार मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही, व्हिडिओ शूटिंग आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या निवडणुकीत विखे-थोरात पॅनल विरुद्ध खासदार निलेश लंके पॅनल अशी थेट लढत होत असून, राम शिंदे यांच्या समर्थकांमुळे लढत अधिक चुरशीची बनली आहे.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी परळीत इंडिया आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
बीड जिल्ह्याच्या परळी शहरातील साई प्रेम पॅलेस लॉजवर सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने धडक कारवाई केल्याची माहिती संबंधित पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. या लॉजवर मागच्या अनेक दिवसांपासून पत्त्याच्या मोठा जुगार सुरू असल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी या अनुषंगाने रात्री उशिरा साई प्रेम पॅलेस या लॉज वर छापा टाकला.
उजनी धरणावरील प्रस्तावित प्रकल्पाच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनावर आणि वक्तव्यावर आमदार राजेंद्र राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांच्या कारखानदारीचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल दिवाळीत वाहतुकीसाठी खुला करण्याची घोषणा महामार्ग विभागाने केली होती. मात्र, कामाचा संथ वेग पाहता उड्डाणपुलाचा दिवाळीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक सुरू होण्यासाठी आता नवीन वर्ष उजाडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे… या निवडणुकीत पाटण मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.सामान्य मतदारांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवत असल्याचं सांगत त्यांनी आपल्याला सहकाऱ्यांनी विश्वासाने मतदान केल्याचा दावा केला.दुसरीकडे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘सबको मौका मिलता है’ असं विधान केल्याबाबत विचारलं असता, निवडणुकीनं
पुण्यातील ससून रुग्णालयात खाजगी एम्बुलेंस पार्किंग करण्यावर प्रशासनाचे निर्बंध.अवाजवी शुल्क आकरणे त्या सोबत सुरक्षा रक्षकांशी वाद घालणे यासाठी आता गेट पास ची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र आम्हाला स्वतंत्र पार्किंग मिळावी अशी मागणी एम्बुलेंस संघटनेने केली आहे आमच्या गाड्यांना अनधिकृत शुल्क आकारल जात,ससून प्रशासन आणि खाजगी एम्बुलेंस संघटनांमध्ये वाद पाहायला मिळत आहे
पुण्यात व्यावसायिकांची रोकड असलेली बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. यश सोनवणे आणि निहाल अडगळे अशी आरोपींची नावे आहेत. ३०० ते ३५० सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा छडा लागला. स्वारगेट परिसरात पाच लाखांची आणि मार्केटयार्डमध्ये ३० लाखांची रोकड लुटल्याची कबुली आरोपींनी दिली. दोन्ही गुन्ह्यांत २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्यातील हवामान बदलण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात जिल्हा बँकेसाठी एका तासगाव केंद्रावर 50 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहॆ. विशेष म्हणजे तासगावमध्ये मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याचे चित्र आहॆ. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती प्रचंड भयानक असल्याने आशा परिस्थितीत दुष्काळी जनतेच्या पाठीशी उभा राहणे आवश्यक असल्याचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.
अमरावतीत शासकीय निधी वेळेवर न मिळाल्याने संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद मुख्यालयाच्या परिसरात महाराष्ट्र सरकारचे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले आहे’ अशा मजकुराचे ‘शोक संदेश’ फलक लावले आहे
सातारा जिल्ह्यात 11 मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडत असून 2021 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार. 21 जागांपैकी 12 जागांवर लढत.यामध्ये माण तालुक्यात मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे, फलटण तालुक्यात संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर अशी प्रमुख लढत पाहायला मिळत आहे.
जेष्ठ नेते शरद पवारांचा आज पासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मधील सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत.. शरद पवार सध्या गोविंद बाग या निवासस्थानी असून त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना भेटून यानंतर सकाळी दहा वाजता शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यावर निघणार आहेत..सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
श्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, एकरी सात क्विंटलपर्यंत मिळणारा उतारा यंदा अवघ्या एक ते दीड क्विंटलवर आला आहे. तर दुसरीकडे, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पादन आलेलं नाही.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गोकुळ शुगर कारखान्याच्या शेतकऱ्यांचे ऊस बिल होते थकीत,शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि तहसीलदार किरण जमदाडे यांनी मध्यस्थी करत ऊस बिल मिळवून देण्याचे दिले होते आश्वासन.अखेर थकीत ऊस बिल धारकांना धनादेशाचे वाटप सुरू
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 6 जागांसाठी आज चार तालुक्यातील 12 केंद्रावर मतदान प्रकिया सुरु झाली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी पंधरा जागा बिनविरोध झाल्या तर 6 जागांची निवडणूक लागली. जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज सोसायटी गट तसेच भटक्या जाती जमाती आणि अनुसूचित जाती या गटासाठी निवडणूक होत आहे.
नांदेड येथून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस एक नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आठ तास उशिराने धावणार आहे सचखंड एक्सप्रेस नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी नऊ वाजून 30 मिनिटे एवजी सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी सुटेल नियोजित वेळेपेक्षा आठ तास उशिराने रेल्वे सुटणार असल्याने प्रवाशांनी स्थानकावर जाण्यापूर्वी सुधारित वेळेची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
वर्ध्यातील कारला चौक परिसरातील श्री कृष्णा माई गोरस भंडारमध्ये भेसळयुक्त दूध विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहेय. दूध गरम करताच त्यावर प्लास्टिकसदृश साय तयार झाली आहेय. या प्रकाराचा व्हिडिओही समोर आला आहेय. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होतीय. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली होती. आता पुन्हा भेसळयुक्त दुधाचा प्रकार समोर आल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेय.
नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्याची बैलजोडी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.मुकेश पाटील यांच्या शेतातील शेडमधून ही बैलजोडी चोरीला गेली होती. याप्रकरणी नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रूपेश भरत पाटील, मनिष रमेश पाटील व त्यांचा साथीदार महेंद्र दादाभाऊ भोई यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरी केलेली बैलजोडी टाटा एस वाहनाद्वारे जळगावच्या गुरांच्या बाजारात विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून ३५ हजार रुपये रोख आणि ३ लाख रुपयांचे वाहन असा एकूण ३,३५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, नरडाणा पोलिसांमार्फत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरटेक येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी पावसाची दडी, वाढती उष्णता आणि बाजारभावातील घसरणीमुळे दुहेरी संकटात सापडले आहेत. उष्णतेमुळे टोमॅटो वेळेआधीच पिकून खराब होत असून, व्यापाऱ्यांकडून अवघा ७ ते ८ रुपये प्रतिकिलोचा नीचांकी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. ४ एकरांवर लागवड केलेल्या स्वप्निल सुधाकर जाधव या शेतकऱ्याचा अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला असून, उत्पन्नात मोठी घट झाल्याने आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पाच जणांविरोधात 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे. आंदोलनादरम्यान फलक आणि घोषणांच्या माध्यमातून आपली बदनामी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात नारपोली पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. काल्हेर येथील अरिहंत कंपाउंड परिसरात टाटा टेम्पोमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नारपोली पोलिस आणि FDA च्या पथकाने संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.