इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या आगामी हंगामासाठी क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित अशा आयपीएल मिनी-लिलावाची तारीख आणि ठिकाण अखेर निश्चित करण्यात आलेले आहे. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, यंदा खेळाडूंवर कोटी रुपयांची उधळण करणारा हा भव्य मिनी-लिलाव आगामी 16 डिसेंबर रोजी गोव्यातील एका अत्यंत सुप्रसिद्ध आणि आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना समोर आलीये. जुन्या मालमत्तेच्या वादातून एका कुटुंबावर तलवारी आणि चाकुने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी सुनील तुकाराम वानखडे यांच्या शेतातील काढणी करून रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली असून,या आगीत तीन एकरांतील सोयाबीन जळून खाक झालं आहे,सुमारे एक लाख रुपयांचं नुकसान झालं असून, सोयाबीनसोबत जनावरांसाठीचा कुटारही जळून नष्ट झाले आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत चित्रीकरणाच्या मुद्द्यावरून मोठा राडा झाला असून, शहरातील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महासभेचे कव्हरेज करण्यावर बंदी असल्याच्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यावर महापालिकेने असा कोणताही ठराव किंवा पत्रव्यवहार झाला नसल्याचे लेखी उत्तर दिले होते.
अमरावती शिक्षक मतदार संघातले महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री शिंदे सभा घेणार आहेत. किरण सरनाईक यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांची रणनीती आहे. अनेक उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीसाठी अमरावती मतदार संघातील लढतीकडे शिंदे यांचे लक्ष.
अमरावती शिक्षक मतदारसंघा निवडणूक वातावरण चांगलेच तापत आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार श्रीकृष्ण पहुरकर यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर एक गंभीर आरोप केला आहे. संस्थेच्या कॉलेजमधील मतदारांना भेटू दिले जात नाही, त्यांना थेट मनाई केली जात आहे.
नाशिकच्या चांदवड येथील रेणुका मातेच्या दर्शनाला आज भाविकांची मोठी गर्दी झाली,रेणुका माता अनेकांची कुलस्वामिनी असल्याने आज शनिवार व उद्याचा रविवार सुट्टीचे दिवस तसेच आज 7वी माळ असल्याने भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
‘पाणी संकट..पाणी वाचवा… विशेषतः शहरातल्या लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे’, हे आवाहन केले आहे मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले कलाकार वैभव मांगले यांनी. सिनेकलाकार, सिनेसृष्टीतील मंडळी आपल्या मनोरंजनासह समाजातील विविध विषयांवर वेळोवेळी आपले मतही मांडताना दिसतात.
जळगावमध्ये आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आदिवासी विकासमंत्री यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
भिवंडी तालुक्यातील अंजूर येथील महावीर कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस निर्जनस्थळी सूरज रणजीत शर्मा (27) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. बहिणीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या रागातून मित्रांनीच त्याच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या चार तासांत संदेश खंडारे (20) आणि आकाश पवार (19) या दोघांना अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शिवसेना UBT आमदार महेश सावंत यांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्याची माहिती दिली. तसेच, प्रशासनाने घातलेल्या अटींची पूर्तता करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा-देवळाई परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नव्या जलवाहिनीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. दिवाळीपूर्वीच काम पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. सध्या या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, नव्या जलवाहिनीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला असताना, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून, निवडणुकीच्या प्रचारात महायुतीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सावर्डे येथील कोंडमाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
मुंबई महापालिकेकडून अभिनेता अजय देवगण यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
शारदीय नवरात्रोत्सवामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सुट्ट्यांचे दिवस असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरीवरून भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. श्रीकांत देशपांडे यांच्यावर कारवाई करून बंडखोरी रोखावी, असा सल्ला त्यांनी दिला.