महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Oct 2026 10:22 AM (IST)

    भांडुप हायवेवर टेम्पोची झाडाला धडक चालक किरकोळ जखमी

    पूर्व द्रुतगती मार्गावरील भांडुप हायवेवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट झाडाला धडकला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वाहतूक विभागा घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करण्यात आला.

  • 20 Oct 2026 09:33 AM (IST)

    रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी ऐकणं महागात पडणार! प्रवाशांना 5 हजारांपर्यंत दंड

    रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा स्पीकरवर मोठ्याने बोलून सहप्रवाशांना त्रास देणे आता महागात पडू शकते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून संबंधित प्रवाशांवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये काही प्रवासी हेडफोनचा वापर न करता गाणी, बातम्या आणि व्हिडिओ मोठ्या आवाजात सुरू ठेवतात. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या प्रवासात इतर प्रवाशांच्या विश्रांतीत व्यत्यय येतो. अशा गैरसोयींना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

  • 20 Oct 2026 08:34 AM (IST)

    नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 21 ठिकाणी पथसंचलन

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस अर्थातच विजयादशमी निमित्ताने नाशिक शहरात तब्बल 21 ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या वर्षी संपूर्ण शहरातील गट स्तरावर काढण्यात आलेलं संचलन यंदा मात्र नगर स्तरावरून काढण्यात आले.

  • 20 Oct 2026 08:33 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या महामेळाव्याला नाममात्र प्रतिसाद

    पुणे मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या महामेळाव्याकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोठ्या आयोजनानंतरही अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्याने उपस्थितीचा प्रश्न चर्चेत आला. विकासाचे व्हिजन मांडण्याऐवजी नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांवरच अधिक भर दिल्याचे दिसून आले

  • 20 Oct 2026 08:29 AM (IST)

    बीड जिल्ह्यात आज होणार तीन दसरा मेळावे

    बीड जिल्ह्यात आज तीन दसरा मेळावे होणार आहेत... पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवान भक्ती गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे तर नारायण गडावरील मेळाव्यास मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे तर दुसरीकडे मच्छिंद्रनाथ गड येते आमदार सुरेश धस यांचा देखील दसरा मेळावा होणार असून यावेळी संत महंतांची उपस्थिती राहणार आहे

  • 20 Oct 2026 08:24 AM (IST)

    दुष्काळावर मात करण्यासाठी एकमेकांना मदतीचे आवाहन – राम शिंदे

    राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सर्वांनी एकमेकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले. राज्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळ लागू असल्याने शासनाच्या अधिसूचना संबंधित विभागांना लागू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आई अंबेकडे प्रार्थना केली. यासंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी.

  • 20 Oct 2026 08:22 AM (IST)

    सावरोलीतील रोजगाराचा वाद मिटला! शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये 50-50 टक्के कामवाटपाचा निर्णय

    रायगडच्या खालापूर तालुक्यातील सावरोली येथील L&T कंपनीतील स्थानिक रोजगारावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. खालापूर तहसील कार्यालयातील बैठकीदरम्यान दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू विश्वनाथ थोरवे यांच्या आक्षेपानंतर वातावरण तापले होते.

  • 20 Oct 2026 08:21 AM (IST)

    विजयादशमीनिमित्त येवल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन; नागरिकांकडून पुष्पवृष्टीने स्वागत

    विजयादशमीनिमित्त येवला शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवरून शिस्तबद्ध संचलन काढण्यात आले. या संचलनात लहान धारकरी देखील सहभागी झाले होते. संघाच्या गणवेशातील स्वयंसेवकांच्या या संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी संचलनावर पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.

  • 20 Oct 2026 08:20 AM (IST)

    मराठा आंदोलन मनोज जरांगे यांचा श्री शेत्र नगद नारायण गडावर आज दसरा मेळावा

    बीडच्या नारायण गडावर आज दसरा मेळाव्याचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणारा हा सलग तिसरा दसरा मेळावा आहे. मात्र, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे कारण पुढे करत हा मेळावा घेऊ नये, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाकडून घेत विरोध करण्यात आला. त्यामुळे मेळाव्याआधीच राजकीय वातावरण तापलं आहे

  • 20 Oct 2026 08:03 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा समारोप रेशीमबाग मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाने होणार.

    सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या भाषणातून संघाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जगभरातील जेन-झी आंदोलने, तरुणांमधील असंतोष, बेरोजगारी, महागाई आणि बदलती सामाजिक परिस्थिती या मुद्द्यांवर भागवत काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता आहे. तसेच सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता, तरुणांचा सहभाग आणि संघाच्या आगामी कार्याची दिशा यावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल यानिव रेवाच आणि ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता यांची उपस्थिती असणार आहे.

  • 20 Oct 2026 07:44 AM (IST)

    माळशिरस मध्ये मोहिते पाटील गटाला धक्का

    माळशिरस तालुक्यातील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे दसऱ्याच्या मुहूर्तावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणारा असून हा मोहिते पाटील गटाला मोठा धक्का मानला जात आहे

  • 20 Oct 2026 07:44 AM (IST)

    विजयादशमी (दसरा) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट,

    साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी (दसरा) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा व आकर्षक पानांचा वापर करून मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number