विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

LIVE NEWS & UPDATES 20 Oct 2026 09:28 AM (IST) ठाकरे विरुद्ध शिंदे! शिवाजी पार्क ते नेस्को सेंटर; दसरा मेळाव्यांतून कोणता संदेश देणार? मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथून सध्या दसरा मेळाव्याची मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यातून कोणती भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. […]

विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Oct 2026 09:28 AM (IST)

    ठाकरे विरुद्ध शिंदे! शिवाजी पार्क ते नेस्को सेंटर; दसरा मेळाव्यांतून कोणता संदेश देणार?

    मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथून सध्या दसरा मेळाव्याची मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यातून कोणती भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचाही दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क आणि नेस्को सेंटरवरील या दोन्ही मेळाव्यांतून नेते कोणते राजकीय मुद्दे मांडणार, कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आणि ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाला कोणते वळण मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.

  • 20 Oct 2026 09:26 AM (IST)

    नागपूरच्या विजयादशमी उत्सवात मोहन भागवतांचे भाषण; मंचावर मान्यवरांची उपस्थिती

    नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण सुरू झाले आहे. यावेळी महानगर संघचालक राजेश लोहिया आणि दैनिक जागरणचे संपादक संजय गुप्ता यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते. उत्सवादरम्यान संघाच्या स्वयंसेवकांनी कवायत सादर केली, तर घोष पथसंचलनाचे अवलोकन मंचावरील पाहुण्यांनी केले.

  • 20 Oct 2026 09:10 AM (IST)

    विजयादशमीला दुर्गा महादौडीचा उत्साह; ठिकठिकाणी फुलांची उधळण करत स्वागत!

    जळगावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुर्गादौडीचा आज विजयादशमीच्या दिवशी ठिकठिकाणी फुलांची उधळण करत उत्साहात स्वागत करण्यात आलं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून या दुर्गादौडीचं आयोजन करण्यात येतं. आजच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची आठवण व्हावी, तसेच तरुणांमध्ये धर्मकार्याची प्रेरणा निर्माण व्हावी, हा या दुर्गादौडीमागील मुख्य उद्देश आहे.

  • 20 Oct 2026 08:49 AM (IST)

    विजयादशमी उत्सवात संजय गुप्ता यांचे भाषण; त्यानंतर मोहन भागवत देशाला संबोधित करणार

    विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दैनिक जागरणचे संपादक संजय गुप्ता यांचे भाषण झाल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत देशाला संबोधित करणार आहेत.

  • 20 Oct 2026 08:40 AM (IST)

    राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात उपस्थित

    राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात उपस्थित. गेल्या काही दिवसांपासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्यारे खान विरोधात भूमिका घेत आहेत. प्यारे खान यांची संघ स्थानी उपस्थिती संघ परिवारात चर्चेचा विषय. माहितीनुसार संघाच्या निमंत्रणावरून प्यारे खान विजयादशमी सोहळ्यात उपस्थित

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number