राज्यातील पालकांसाठी आणि लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पूर्व-प्राथमिक वर्गातील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी आता शाळा स्तरावर वयोमर्यादेत तब्बल 15 दिवसांची सूट देण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाने याबाबत नव्या सूचना जारी केलेल्या आहेत.
नवे नियम कधीपासून लागू होणार?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या नुसार आता पायाभूत वर्गातील नामांकन आणि नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी आता नव्या वयोमर्यादा लागू करण्यात आलेल्या आहेत. या धोरणाचे पालन करणे हे सर्व शाळांना बंधनकारक असणार आहे. या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या वयाची अट काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. मात्र काही दिवसांमुळे प्रवेश नाकारला जाऊ नये, यासाठी शाळाप्रमुखांना 15 दिवसांची सूट देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
म्हणजे किमान आणि कमाल वयोमर्यादेत 15 दिवसांपर्यंतची लवचिकता ठेवता येणार आहे. या नव्या वयोमर्यादेबाबतच्या सविस्तर आलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे लवकरच शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून सर्व शाळांना दिली जाणार आहे. या निर्णयामुळे ज्या पालकांच्या मुलांचे वय काही दिवसांनी कमी-जास्त होत आहे, त्यांना मोठा दिलासा मिळेल. शाळेत दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसमानता यावी हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.