आता लोकलला पर्याय ठरणार मेट्रो 4! चालकविरहित ट्रेनची तयारी; कुठून कुठे धावणार?

Mumbai Metro 4 Update : मुंबई मेट्रो मार्ग 4 साठी 39 ट्रेनचे 234 डबे तयार केले जाणार असून, फ्रेंच कंपनी अल्स्टॉमकडून निर्मिती सुरू आहे. हा मार्ग कुठून कुठे जोडला जाणार आणि कधी प्रवाशांसाठी खुला होणार, त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

आता लोकलला पर्याय ठरणार मेट्रो 4! चालकविरहित ट्रेनची तयारी; कुठून कुठे धावणार?
Mumbai Metro Line 4 Big Update

मुंबई आणि ठाणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मेट्रो 4 चे डबे अखेर निर्मिती टप्प्यात आले असून त्याचा नमुना समोर आला आहे. फ्रान्सच्या अल्स्टॉम कंपनीकडून या अत्याधुनिक डब्यांची निर्मिती केली जात आहे. या मार्गावर एकूण 39 ट्रेन धावणार असून 234 डबे उपलब्ध होणार आहे. या मेट्रोची खासियत म्हणजे ती चालकविरहित म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस धावू शकणार आहे.

गायमुख ते वडाळ्यातील भक्ती पार्क असा हा मार्ग असून त्याची घोषण ही 2016 मध्ये करण्यात आली होती. तब्बल 9 वर्षे उलटूनही एकही टप्पा सुरु झाला नाही. मात्र, आता गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा पुढील एक ते दोन महिन्यात सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. अधिकृत तारीख मात्र अजूनही जाहीर केली नाही. मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर या परिसरातील स्थानकांचे काम अजून अपूर्ण असल्याने हा मार्ग डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा मार्ग इतर 5 मार्गांना ही जोडला जाणार आहे. त्यामुळेच लोकलवरील गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number