राज्य परिवहन मंडळाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे 325 कोटींची मागणी केली होती. त्यातील आता 100 कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन मिळावे यासाठी कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकदेखील पार पडली. यावेळी थकीत वेतनवाढ समान टप्प्यात विभागणी करून त्याचा खर्च राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले.
हेही वाचा - Dearness Allowance Hike: सातव्या वेतन आयोगाची मोठी झेप; आता महागाई भत्त्यामध्ये होणार 'इतकी' वाढ, 'या' तारखेला होणार अधिकृत घोषणा
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी थकीत हप्त्याचा निधी महामंडळाकडे वळता करण्याची विनंती सरकारला केली.
हेही वाचा - Delhi Police Action: दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ISI चा 'टेरर प्लॅन' उधळला, तामिळनाडू-बंगालमधून आठ दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या
त्यानुसार अर्थ विभागाने 100 कोटींचा निधी महामंडळाला दिला आहे. उर्वरित निधी लवकरच प्राप्त होण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.