Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! विदर्भात पारा 43 अंशांवर, तर मुंबई-कोकणात वाढणार उकाडा; हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

येत्या 17 एप्रिल 2026 पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) तीव्र होणार असून, नागरिकांना दुपारच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! विदर्भात पारा 43 अंशांवर, तर मुंबई-कोकणात वाढणार उकाडा; हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

Heatwave Alert: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. येत्या 17 एप्रिल 2026 पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) तीव्र होणार असून, नागरिकांना दुपारच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने सतर्क राहण्यास सांगितले आहे.

पाच जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, प्रामुख्याने सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव सर्वाधिक असेल. या भागात कडक ऊन आणि उष्ण वारे वाहण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा म्हणून येथे 'Yellow Alert' देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील नागरिकांनी दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई आणि कोकणात दमट हवामानाचा प्रभाव
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर (MMR विभाग) 16 एप्रिलपर्यंत हवामान कमालीचे उष्ण आणि आर्द्र (Humid) राहणार आहे. जरी मुंबईचे तापमान 34 ते 36 अंशांच्या आसपास नोंदवले जाणार असले, तरी हवेतील ओलाव्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा आणि घामाचा सामना करावा लागेल. यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उष्णतेची जाणीव होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींवर अपात्रतेची कुऱ्हाड! तब्बल 71 लाख महिलांचा लाभ बंद; शासनाकडून खात्यात आलेले पैसे वसूल होणार?

उष्णतेपासून बचावासाठी खबरदारीचे आवाहन
तापमान वेगाने वाढत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. शक्य असल्यास दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. उन्हापासून संरक्षणासाठी हलके आणि सुती कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा आणि पुरेसे लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number