मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जरांगेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे.
शीतल म्हात्रेंचा जरांगेंना पलटवार
नारायण गडावरील दसरा मेळाव्यात जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना या कथित व्यवहाराबाबत जाहीर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले होते. भाजपच्या नेत्यांमध्ये आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणात खासदार श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख करण्यात आला. यानंतर शीतल म्हात्रे यांनी जरांगेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आणि चर्चेत राहण्यासाठी जरांगे अशी वक्तव्ये करत असल्याची टीका त्यांनी केली. आरोपांमध्ये तथ्य असेल, तर जरांगे यांनी त्यासंबंधीचे पुरावे समोर आणावेत, असे आव्हानही म्हात्रे यांनी दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.