बेकायदेशीर फटाके बनवताना घरात भीषण स्फोट; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक गंभीर जखमी

जिल्ह्यातील जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अल्मापूर गावात एका घरात फटाके बनवत असताना झालेल्या अचानक आणि तीव्र स्फोटात 4 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

बेकायदेशीर फटाके बनवताना घरात भीषण स्फोट; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Siwan cracker blast

बिहारमधील सिवान जिल्ह्यात गुरुवारी एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अल्मापूर गावात एका घरात फटाके बनवत असताना झालेल्या अचानक आणि तीव्र स्फोटात 4 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की संपूर्ण अल्मापूर गावात घबराटीचे वातावरण पसरले आणि नागरिक भीतीने घराबाहेर पडले.

ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की ज्या घरात फटाके तयार केले जात होते, त्या संपूर्ण घराचा ढाचा कोसळून ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. स्फोटानंतर घटनास्थळी मोठा धुराचे लोट पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच सिवानचे पोलीस अधीक्षक (SP) भरत सोनी यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले असून, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.

हेही वाचा – वाहनचालकांच्या खिशाला पुन्हा कात्री; अदानी टोटल गॅसकडून CNG च्या दरात प्रति किलो ‘इतक्या’ रुपयांची वाढ

पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू

या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधीक्षक भरत सोनी यांनी सांगितले की, या ठिकाणी फटाके बनवण्याची कायदेशीर परवानगी होती की हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता, याचा सखोल तपास केला जात आहे. तसेच स्फोटाचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number