Tuesday, February 17, 2026 07:09:44 AM

T20 World Cup : 'ही सर्वात डेंजर टीम.. मला भीती वाटतेय..' MS Dhoniची सूर्याला 'वॉर्निंग'! पाहा 'थाला'ने काय दिला सल्ला?

टीम इंडियाचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे कौतुक केले. शिवाय, एका गोष्टीबद्दल भीती व्यक्त केली.

t20 world cup  ही सर्वात डेंजर टीम मला भीती वाटतेय ms dhoniची सूर्याला वॉर्निंग पाहा थालाने काय दिला सल्ला

MS Dhoni On Team India in T20 World Cup : T20 विश्वचषकाचा थरार अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाविषयी मोठे भाष्य केले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे कौतुक करतानाच धोनीने एका महत्त्वाच्या संकटाबाबत 'डेंजर' इशाराही दिला आहे. धोनी म्हणाला, निसर्गाचा एक घटक खेळाचे सर्व गणित बिघडवू शकतो.

टीम इंडिया सर्वात खतरनाक!
जयपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना धोनीने टीम इंडियाच्या सध्याच्या फॉर्मवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, "सध्याच्या परिस्थितीत मला सर्वात 'डेंजर' संघ कोणता वाटत असेल, तर तो टीम इंडिया आहे. एका विजेत्या संघात जे गुण असावे लागतात, ते सर्व या संघात आहेत." धोनीने भारतीय खेळाडूंच्या अनुभवावर विशेष भर दिला. दबावाखाली कसे खेळायचे, याचा मोठा अनुभव या खेळाडूंना आहे आणि अनेक काळापासून ते आपली भूमिका चोख बजावत आहेत. त्यामुळे कागदावर हा संघ कुणालाही धूळ चारण्यास समर्थ आहे. धोनीच्या मते, टीम इंडिया सध्या सर्वात ताकदवान संघ आहे.

हेही वाचा - T20 World Cup 2026: 22890000000...! भारताशी खेळण्यास नकार देणे पाकिस्तानला पडणार महागात; ICCकडून मैदानावर 'सर्जिकल स्ट्राईक'ची भीती?

मैदानातील 'दव' म्हणजे मोठी अडचण!
टीम इंडियाचे कौतुक करतानाच धोनीने एका गोष्टीबद्दल भीती व्यक्त केली आणि ती म्हणजे मैदानातील 'दव' (Dew Factor). धोनी म्हणाला, "मला कशाची भीती वाटत असेल, तर ती फक्त मैदानातील दवाची. मला दवाचा तिरस्कार वाटतो, कारण त्यामुळे सामन्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते." जेव्हा मैदानावर दव येते, तेव्हा गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवणे कठीण जाते आणि सामना टॉसवर अवलंबून राहतो. धोनी म्हणाला, जर परिस्थिती तटस्थ असेल आणि आपण जगातील सर्वोत्तम संघाविरुद्ध 10 सामने खेळलो, तर भारतीय संघ बहुतांश वेळा जिंकेल. मात्र, 'दव' हा असा घटक आहे जो या विजयाच्या गणितात अडथळा ठरू शकतो.

धोनीचा सूर्याला कानमंत्र; म्हणाला, 'आता अपशकुन करण्याचं टाळतो'
धोनीने कर्णधार सूर्यकुमार यादवला टॉसची भूमिका किती महत्त्वाची ठरेल, याची जाणीव करून दिली. टी20 क्रिकेटमध्ये कधी आपला बेस्ट खेळाडू फेल जातो, तर कधी विरोधी संघातील एखाद्या खेळाडूचा दिवस असतो; अशा वेळी सामना हाताबाहेर जातो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने दुखापतींपासून लांब राहून आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावणे गरजेचे असल्याचे धोनीने म्हटले. "मला आता काहीही बोलून अपशकुन करायचा नाही, पण नक्कीच टीम इंडियाचा संघ या स्पर्धेतील सर्वात धोकादायक संघांपैकी एक आहे," असे म्हणत धोनीने आपल्या भावनांना आवर घातला.

हेही वाचा - Sports Budget 2026: खेळाडूंना जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! बजेट 2026 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी दोन महत्त्वाचे निर्णय


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या