Petrol Price Hike : वाहनचालकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी महागलं; पाहा मुंबई, पुणेसह दिल्लीतील नवे दर

जागतिक तणावाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत चढउतार होत असताना आता भारतातील इंधनात मोठी वाढ झाली आहे.
Petrol Price Hike
Petrol Price Hike

जागतिक तणावाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत चढउतार होत असताना आता भारतातील इंधनात मोठी वाढ झाली आहे. भारतातील इंधनाची विक्री करणारी सर्वात मोठी खाजगी कंपनी असलेल्या नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सुमारे 7,108 पेट्रोल पंपांचे संचालन करणाऱ्या नायरा एनर्जीने शनिवारी पहाटेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. नायरा एनर्जीकडून पेट्रोल दरात 5 रुपयांची, डिझेल दरात 3रुपयांची वाढ. भारतातील सर्वात मोठी खाजगी इंधन विक्रेता कंपनी असलेल्या नायरा एनर्जीने, किरकोळ दर आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय तेल व शुद्ध उत्पादनांच्या किमतींमधील तफावत कमी करण्याच्या उद्देशाने, पेट्रोल दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेल दरात 3 रुपयांनी तात्काळ प्रभावाने वाढ केली आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिली.

हेही वाचा- रिक्षाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 2 मोठे निर्णय लागू

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले तेल व प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दर आणि किरकोळ विक्रीचे दर यांमधील तफावत कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे कळतंय. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत इंधन विक्रेत्यांवरील खर्चाचा बोजा वाढला आहे. जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता कायम असताना आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढउतार होत असताना नायराचा हा निर्णय आला आहे. दरम्यान मुंबई, पुणे, नाशिकसह दिल्ली आणि चेन्नईतील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घ्या.

पेट्रोलचा भाव
मुंबई – ₹111.21
नाशिक – ₹112.44
पुणे – ₹111.90-112.02
दिल्ली – ₹102.12
चेन्नई – ₹107.76

डिझेलचा भाव
मुंबई – ₹97.83
नाशिक – ₹99.05
पुणे – ₹98.68
दिल्ली – ₹95.20
चेन्नई – ₹99.55

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version