काळाचा घाला! नाशिकमधील चार भाविकांचा दुर्दैवी अपघात; 4 जणांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी

राजस्थानमधील जयपूर येथे पहाटे नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुदैवी दुर्घटनेत नाशिकमधील सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

काळाचा घाला! नाशिकमधील चार भाविकांचा दुर्दैवी अपघात; 4 जणांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी

राजस्थानमधील जयपूर येथे पहाटे नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुदैवी दुर्घटनेत नाशिकमधील सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने मदतकार्याच्या अनुषंगाने पुढाकार घेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अपघातातील मृत व्यक्तींचे शवविच्छेदन लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली.

हेही वाचा – भोर पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर दोन चुलत भावांकडून अत्याचार; प्रसूतीनंतर प्रकरण उघडकीस

या अपघातात जे भाविक गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात हलवून त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंतीही मंत्री महाजन यांनी केली.

परिणामी, राजस्थानच्या राज्यपाल कार्यालयानेही या संपूर्ण घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली, यामुळे अपघातातील जखमींना सर्वतोपरी आवश्यक वैद्यकीय सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कार्यरत असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आली आहे. या घटनेमुळे सटाणा परिसर आणि नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number