पुण्यासह ‘ही’ शहरं गाठणं होणार सोपं; नवी मुंबई विमानतळावरून धावणार ई-शिवाई बस, जाणून घ्या मार्ग अन् तिकीट

Navi Mumbai Airport Bus : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांसाठी आता प्रवास अधिक सोपा होणार आहे. विमानतळावरून विविध शहरांसाठी नव्या इलेक्ट्रिक बससेवेचा पर्याय उपलब्ध होणार असून, मोफत शटल सेवाही मिळणार आहे. मात्र, या बस कुठे धावणार आणि तिकीट किती असणार? जाणून घेऊया.

पुण्यासह ‘ही’ शहरं गाठणं होणार सोपं; नवी मुंबई विमानतळावरून धावणार ई-शिवाई बस, जाणून घ्या मार्ग अन् तिकीट
Navi Mumbai Airport Bus

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन शहरात आता येणे आणि जाणे अधिक सोपे आणि अधिक स्वस्त होणार आहे. फक्त आणि फक्त प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाची ई-शिवाई इलेक्ट्रिक बस सेवा सुरु होत आहे.

कधीपासून करता येणार प्रवास?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ई-शिवाई सेवा ही आजपासून अर्थात 7 ऑक्टोबर 2026 पासून सुरु होणार आहे. या बसेस नवी मुंबई विमानतळावरुन थेट दादर, बोरिवली आणि पुण्याला जाणार आहे. दादरला जाणारी बस ही सायन आणि अटल सेतू मार्गे धावेल, तर बोरिवली बस ही मुंबई विमानतळ टर्मिनल-1 आणि वांद्रे मार्गे जाईल.

हेही वाचा-मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! आसनगांव-कसारा लोकल आजपासून बंद; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

जाणून घ्या तिकीट दर
नवी मुंबई विमानतळावरुन दादर पूर्वपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना 1170 रुपये आकारले जातील, बोरिवलीसाठी 1290 रुपये आणि पुण्यासाठी 1450 रुपये आकारले जाणार आहे. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांना मोठी सवलत मिळणार आहे. दुसरीकडे 12 वर्षांखालील मुले आणि NCMC कार्ड असलेल्या महिलांना निम्मे तिकीट आकारले जाईल. दरम्यान, ठाणे तसेच नाशिकसाठी देखील काही वसांतच ई-शिवाई बस सुरु होऊ शकते. जी सेवा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरु होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.

मुंबई विमानतळासाठी मोफत शटल
नवी मुंबई विमानतळावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत शटल सेवा ही सुरु होणार आहे. या दोन्ही विमानतळांदरम्यान दर तासाला ही बस धावेल, अशी माहिती मिळत असून बेस्टच्या चलो बसेस या नवी मुंबई विमानतळावरुन अंधेरीच्या मरोळ,वांद्रे, दादर, कुलाबा येथील असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरपर्यंत धावेल. तर एनएमएमटीच्या बसेस या खारकोपर, तळोजा, बेलापूर, नेरुळ, पनवेल, थांडेश्वरसाठी उपलब्ध असतील.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number