नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. नऊ दिवस देवीची आराधन आणि उपवास हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग असतो. मात्र, अनेक तास उपाशी राहिल्यामुळे पोटात अॅसिड तयार होऊन जळजळ, आंबट ढेकर आणि छातीत दुखण्याचा त्रास हा सुरु होतो. उपवासाचा आनंद घेत असताना तुम्हालाही अॅसिडिटी होऊ देयची नसेल तर काही सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.
उपवास करताना ‘या’ चुका टाळा
उपवासाच्या दिवसात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे योग्य आहार. रिकाम्या पोटी उपवासाला सुरुवात कधीच करुन नका. सकाळी केळे, सफरचंद, मूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा थोडे दही खाऊन तुमच्या उपवासाची सुरुवात करा. त्यामुळे पोटात थेट अॅसिड तयार होणार नाही.
हेही वाचा-दाढी करावी की नाही? नखं कापणं योग्य की अयोग्य? नवरात्रीच्या नऊ दिवसांतील नियम जाणून घ्या
एकाच वेळी पोटभरून खाण्याऐवजी दर दोन ते तीन मिनिटांनी थोडे-थोडे खात रहा. उकलेले रताळे, कमी तेलातील साबुदाणा खिचडी, राजगिर लाडू, खजून तसेच पपी, केळी यांसारखी फळे नक्की खा. महत्त्वाचे म्हणज साबुदाणा वडे, बटाट्याची तळलेली भादी, आंबट फळे आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळा.
पाण्याचे प्रमाण वाढवा
अॅसिडिटी टाळण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. दिवसभर थोडे-थोडे पाणी पित राहत राहा. त्यामुळे पोटातील अॅसिड पातळ होते.नवरात्रात उपवासाच्या दिवशी चहा-कॉफी पिणे टाळा. कॅफीनमुळे अॅसिडिटी वाढते. त्याऐवजी थंड दूध, ताक, नारळ पाणी किंवा लिंबू-सरबत प्या. हे नैसर्गिकरित्या पोट थंड ठेवण्यास मदत करतात.