Pune Ganpati Visarjan 2026: परंपरेच्या कुशीत वसलेल्या पुण्यातील ‘या’ मानाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत ‘आई तुळजाभवानीचा देखावा’
गणपती गेले गावाला,चैन पडेना आम्हांला! आज सर्वत्र बाप्पाच्या विसर्जनाची जोरदार तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी ढोलताशे व मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. यातच पुण्यातील दुसरा मनाचा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा एक आगळावेगळा सोहळा पार पडला. यंदा बाप्पा थेट आई तुळजाभवानीच्या रथातून मार्गस्थ झाला.हा रथ खास तुळजापूरहून आणण्यात आला होता. देवीच्या पारंपरिक अलंकारांनी आणि […]
गणपती गेले गावाला,चैन पडेना आम्हांला! आज सर्वत्र बाप्पाच्या विसर्जनाची जोरदार तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी ढोलताशे व मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. यातच पुण्यातील दुसरा मनाचा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा एक आगळावेगळा सोहळा पार पडला. यंदा बाप्पा थेट आई तुळजाभवानीच्या रथातून मार्गस्थ झाला.हा रथ खास तुळजापूरहून आणण्यात आला होता. देवीच्या पारंपरिक अलंकारांनी आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने रथाला सजवण्यात आले होते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. या सोहळ्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा अधिकच समृद्ध झाली आहे. मागच्या वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्राचे 3 शक्तीपीठ दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाचा सुरूय. मागच्या वर्षी कोल्हापूरची अंबाबाईचा देखावा होता, मात्र यावर्षी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा जीवंत देखावा व चित्ररथ साकारण्यात आले आहे.
भक्तांसाठी पर्वणी:
1. या पारंपरिक सोहळ्यामुळे संपूर्ण मिरवणुकीला एक वेगळेच धार्मिक आणि सांस्कृतिक वलय प्राप्त झाले.
2. गणपती बाप्पा आणि कुलस्वामिनी तुळजाभवानीचा एकत्रित हा योग पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, टिळक चौक आणि बेलबाग चौकात भाविकांनी अक्षरशः गर्दी केली होती.
3. ढोल-ताशांच्या गजरात, ‘उदो उदो’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
4. मानाच्या पाचही गणपतींपैकी तांबडी जोगेश्वरीच्या या नव्या उपक्रमाचे पुणेकरांनी मोठे स्वागत केले.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत वारकरी परंपरेचे भक्तिमय दर्शन
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा वारकरी परंपरेचीही विशेष झलक पाहायला मिळाली आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, हातात टाळ-मृदंग आणि मुखी अखंड ‘ज्ञानोबा-तुकोबा’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ चा जयघोष करत शेकडो वारकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपरिक पांढरे धोतर, डोक्यावर टोपी आणि कपाळी बुक्का लावलेल्या वारकऱ्यांच्या रिंगण आणि फुगड्यांनी उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या आधुनिक गजरात वारकऱ्यांचा हा पारंपरिक अभंग आणि भजनाचा सूर मिसळल्याने पुण्याच्या मिरवणुकीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.