Monday, February 09, 2026 03:00:52 PM

Traffic Index Survey : या शहरांमध्ये प्रवास म्हणजे 'डोकेदुखी'! देशात सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या 10 शहरांत पुणे 'या' स्थानी आणि मुंबई..

वाहतूक कोंडीच्या बाबतीत जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर मोठी उलथापालथ झाली आहे. शहरांमधील वाहतूक तज्ज्ञ आणि नागरिकांनी या कोंडीसाठी खिळखिळी झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

traffic index survey  या शहरांमध्ये प्रवास म्हणजे डोकेदुखी देशात सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या 10 शहरांत पुणे या स्थानी आणि मुंबई

Traffic Index Survey : पुणे महानगरपालिका निवडणुकीत नेहमीच कळीचा मुद्दा ठरणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली आहे. 'टॉमटॉम' या संस्थेने 2025 वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या जागतिक अहवालानुसार, पुण्याचा देशातील सर्वाधिक संथ वाहतुकीच्या शहरांमध्ये दुसरा क्रमांक लागला आहे. या अहवालातील धक्कादायक आकडेवारीनुसार:
- पुण्यातील वाहनचालकांना केवळ 10 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सरासरी 33 मिनिटे 20 सेकंद लागतात.
- सर्वाधिक गर्दीच्या वेळी (Peak Hour) शहरातील वाहनांचा वेग ताशी केवळ 15.1 किलोमीटर इतका कमी असतो.
- जागतिक स्तरावर पुण्याचा वाहतूक कोंडीचा स्तर 71.1 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

बंगळुरू देशात अव्वल, मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
वाहतूक कोंडीच्या बाबतीत जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर मोठी उलथापालथ झाली आहे. मेक्सिको सिटी हे शहर जगातील सर्वाधिक ट्रॅफिकचे शहर ठरले असून, भारताचा विचार करता बेंगळुरूने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. पुणे या यादीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या (२०२४) तुलनेत पुण्याच्या जागतिक क्रमवारीत किंचित सुधारणा झाली असून, पुणे चौथ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी पोहोचले आहे. मात्र, शहरातील वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव आणि वाढलेली अतिक्रमणे यामुळे कोंडीची तीव्रता कमी झालेली नाही.

हेही वाचा - Local Train CCTV: मुंबई लोकलचा 'तिसरा डोळा' आता ट्रॅकवर; अपघात आणि वादांवर सीसीटीव्हीची करडी नजर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा
पुण्यातील वाहतूक तज्ज्ञ आणि नागरिकांनी या कोंडीसाठी खिळखिळी झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शहराची सध्याची स्थिती पाहता:

- पुणे शहराला किमान 4,500 बसची गरज असताना सध्या केवळ 2,000 बसद्वारे सेवा दिली जात आहे.
- खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येवर निर्बंध आणण्यासाठी प्रशासनाकडून ठोस धोरण आखले गेलेले नाही.
- बेशिस्त पार्किंग आणि वाहनतळ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने मुख्य रस्त्यांवर श्वास कोंडत आहे.

नव्या कारभाऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर
वाहतूक कोंडीचा हा प्रश्न केवळ वेळेचा नसून तो शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासावरही परिणाम करत आहे. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आता शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. आगामी ५ वर्षांत पुण्याच्या नव्या लोकप्रतिनिधींसमोर सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आणि नागरिकांना खासगी वाहनांऐवजी बस किंवा मेट्रोकडे वळवणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. योग्य पावले न उचलल्यास पुण्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनावर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Mumbai Railway : मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार हायटेक, 'या' स्थानकादरम्यान 2184 कोटींच्या प्रकल्पाचा श्रीगणेशा; काय आहे मास्टरप्लॅन?


सम्बन्धित सामग्री