फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, परिसरातील दुमजली इमारती कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली.

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, परिसरातील दुमजली इमारती कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
explosion in firecracker factory

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे इमारतीची रचना कोसळली असून, अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे या व्यवसायातील सुरक्षा नियमांविषयीचा नेहमीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे वाराणसीतील सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारंग तलाव परिसरात हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्यास सांगितले आहे. तसेच, जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा : जळगाव हादरलं! भीषण अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा अंत; अवघ्या काही क्षणात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number