कल्याणमध्ये थरकाप उडवणारी घटना! इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे गंभीर जखमी; धक्कादायक सत्य समोर

Kalyan News : कल्याण पूर्वेतील गणेश वाडी परिसरात धोकादायक शुक्ला इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून जी माहिती समोर आलेली आहे, त्याने सर्वजण हादरुन गेले आहेत.

कल्याणमध्ये थरकाप उडवणारी घटना! इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे गंभीर जखमी; धक्कादायक सत्य समोर
Kalyan East Building Slab Collapse

कल्याण पूर्व येथील गणेशवाडी या परिसरात धक्कादायक आणि संतापजन घटना घडलेली आहे. शुक्ला इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. याच दुर्घटनेत रस्त्यावरुन जात असलेले एक-दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, स्थानिकांकडून जी माहिती समोर आलेली आहे, त्याने सर्वांनाच हादरुन सोडलं आहे. नेमकं काय सांगितलं आणि काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात.

इमारतीच्या दुर्घटनेने परिसर हादरला
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथे ही घटना घडली आहे. इमारतीच्या बाल्कनीचा आणि स्लॅबचा मोठा तुकडा हा थेट रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी खालून दुचाकीवरुन जात असलेले नागरिक त्याखाली सापडले. आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींची मदत केली आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा-नात्याला काळिमा! नराधमाने जन्मदात्या आईलाही सोडलं नाही; एकाचवेळी कुटुंबातील तिघांनाही संपवलं

समोर आलं सत्य
ज्या इमारतीचा स्लॅब कोसळला ती इमारत गेल्या काही वर्षांपासून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या गंभीर प्रकाराची वारंवार तक्रार ही स्थानिकांनी महापालिकेकडे केली होती. मात्र तिला रिकामी करण्याची किंवा तोडण्याची कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

अधिकाऱ्यांच्या याच दुर्लक्षामुळे आज निष्पाप नागरिकांना आपली जीव गमवावा लागण्याची वेळ येऊ लागली आहे. सध्या या घटनेमुळे गणेशवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आसपासच्या इमारतींमधील रहिवासीही सध्या दहशतीखाली आहेत. जो पर्यंत पालिका धोकादायक इमारतींवर कठोर कारवाई करत नाही, तोपर्यंत अशाच दुर्घटना घडत राहतील, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number