मतदारांनो, शेवटची संधी! SIR ची अंतिम मुदत जवळ; जाणून घ्या शेवटची तारीख काय?

Maharashtra Voter List Update : महाराष्ट्रात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला वेग आला आहे. निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. मतदारांसाठी अंतिम मुदतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
SIR प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
SIR Deadline in Maharashtra

महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी शेवटची मुदत निश्चित केलेली आहे. दिलेल्या मुदतीमध्येच तुमचे यादीत नाव समाविष्ट न झाल्यास मतदान करताना अडचणी येऊ शकते. जाणून घ्या महत्त्त्वाची तारीख आणि संपूर्ण माहिती.

महाराष्ट्रात मतदार पडताळणीची प्रक्रिया चर्चेत
31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारुप मतदार याद्या जाहीर झालेल्या होत्या. त्यानंतर नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्तीसाठी एक ऑक्टोबरची नवी तारीख दिली आहे. आतापर्यंत पाहिलं तर राज्यात 7 लाखांहून अधिक नवीन मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केलेले नाही.

हेही वाचा-रविवारी लोकलचा खोळंबा! मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर

8 ऑक्टोबरपर्यंत 7 लाख 19 हजार 382 जणांनी फॉर्म 6 भरुन नाव नोंदवले आहे. तर तब्बल 3,99,925 मतदारांनी नोंदीत दुरुस्तीसाठी फॉर्म 8 हा भरला आहे. शिवाय 18 हजार 748 जणांनी नाव वगळण्यासाठी फॉर्म 7 हा भरला आहे. ज्या नागरिकांचे नाव अद्यापही यादीत नाही, त्यांच्यासाठी 10 आणि ऑक्टोबर रोजी विशेष शिबिर होणार आहे.

18 वर्षे पूर्ण? ‘हा’फॉर्म भरून करा नोंदणी
राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर हे शिबिर आयोजित केले जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांना या शिबिरामध्ये फॉर्म सहा भरता येणार आहे. विशेष म्हणजे हे अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने BLO कडे किंवा ऑनलाईन ‘https://voters.eci.gov.in/’ या वेबसाइवरही भरु शकता. ज्या मतदारांना नोटीस आलेली आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 13 कागदपत्रांव्यतिरिक्त इतर वैध असलेले कागदपत्र अपलोड करण्यासाठी BLO App वर नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा-मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट; 13 उमेदवारांची माघार; आता 41 जणांमध्ये होणार लढत

जाणून घ्या अंतिम तारीख
महत्त्वाचे म्हणजे 12 ऑक्टोबर 2026 अर्थात अजून दोन दिवसांपर्यंत तुम्ही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया करु शकता, जर हे न केल्यास मतदानाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो. याबाबत मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळेच मतदारांनी अंतिम मुदत लक्षात घेता आपले नाव लवकरात लवकर मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करुन घेणे महत्त्वाचे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version