Saturday, March 07, 2026 02:33:57 AM

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गात मोठा बदल! बार्शीतून जाणार नवा मार्ग; मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात मोठी घोषणा

शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि पूर्वीचा मार्ग नागपूर-कोल्हापूर महामार्गाला समांतर होत असल्याने, आता महामार्गाची दिशा बदलण्यात आली आहे.

shaktipeeth expressway  शक्तिपीठ महामार्गात मोठा बदल बार्शीतून जाणार नवा मार्ग मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात मोठी घोषणा

Update on Shaktipeeth Mahamarg project: नागपूर ते गोवा या बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात मोठा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि पूर्वीचा मार्ग नागपूर-कोल्हापूर महामार्गाला समांतर होत असल्याने, आता महामार्गाची दिशा बदलण्यात आली आहे. नवीन नियोजनानुसार हा महामार्ग आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून वळविण्यात आला असून, यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना दिलासा तर काहींना नव्याने या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मार्गातील प्रमुख बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील मार्गामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत -
- वगळण्यात आलेले तालुके: पूर्वी नियोजित असलेल्या उत्तर सोलापूर आणि सांगोला या तालुक्यांना आता या नवीन आराखड्यातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.
- समाविष्ट केलेले नवीन तालुके: आता हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि माळशिरस या नवीन तालुक्यांतून जाणार आहे.
- तालुक्यांमधील बदल: मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील बाधित गावांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा - NCP Sunetra Pawar Video : "तुमचं बोलून झालं की निघा..." सुनेत्रा पवार यांना न बोलताच पाठवलं, पटेल आणि तटकरेंनी नेमकं काय केलं?

महामार्गाचा नवीन प्रवास कसा असेल?
नवीन आराखड्यानुसार महामार्गाचा सोलापूर जिल्ह्यातील प्रवासाची सुरुवात बार्शी तालुक्यातून होईल. म्हणजेच, बार्शी तालुक्यातून महामार्ग सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढे मोहोळ तालुक्याच्या उत्तरेकडील भागातून पुढे जाऊन माढा तालुक्यात प्रवेश करेल. यापुढील प्रवास माळशिरस तालुक्यातून थेट सातारा जिल्ह्यात प्रवेश असा असेल. शेवटी सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करत महामार्ग गोव्याच्या दिशेने पुढे जाईल.

बाधित तालुक्यांमधील गावांची यादी
नवीन आराखड्यानुसार खालील गावांमधून महामार्ग जाणार आहे:
बार्शी तालुका: रातजंन, सर्जापूर, राळेरास, सासुरे, मुंगशी (वा.), दहिटणे, तडवळे.
मोहोळ तालुका: वाळूज (दे.), भैरववाडी, देगाव, वाफळे, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेटफळ, बैरागवाडी.
माढा तालुका: धानोरे, बुद्रकवाडी, मानेगाव, पाचफुलवाडी, खैराव, कुंभेज, अंजनगाव (खे.), मोडनिंब, बैरागवाडी.
पंढरपूर तालुका: बार्डी, करकंब, भोसे, नेमतवाडी, शेवते, पेहे, अव्हे.
माळशिरस तालुका: जाबुंड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव (म.), चांदापुरी, तरंगफळ, मगरवाडी, गारवाड.

हेही वाचा - MSCB Scam : राज्यात गाजलेल्या घोटाळा प्रकरणाला पूर्णविराम? अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 जणांना न्यायालयाची 'क्लीन चिट'


सम्बन्धित सामग्री