Solar Eclipse 2026: दिवसा पडणार काळोख! 2026 चं पहिलं सूर्यग्रहण ठरणार खास; जाणून घ्या वेळ आणि वैज्ञानिक महत्त्व

विज्ञानाच्या दृष्टीने हे ग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात सूर्याच्या बाह्य थराचा अभ्यास करण्याची संशोधकांना मोठी संधी मिळते.

Solar Eclipse 2026: दिवसा पडणार काळोख! 2026 चं पहिलं सूर्यग्रहण ठरणार खास; जाणून घ्या वेळ आणि वैज्ञानिक महत्त्व

नवी दिल्ली: येत्या 17 फेब्रुवारी 2026 रोजी अवकाशात एक अद्भूत खगोलीय चमत्कार घडणार आहे. या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण असून, जगाला ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजेच एका तेजस्वी अग्नीवलयाचे दर्शन घडणार आहे. विज्ञानाच्या भाषेत याला ‘वलयाकार सूर्यग्रहण’ असे म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो आणि सूर्याच्या समोर येतो, तेव्हा तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. परिणामी, चंद्राच्या कडेने सूर्याचा प्रकाश एका सोन्याच्या अंगठीसारखा चमकताना दिसतो.

खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजून 26 मिनिटांनी या ग्रहणाची सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून 57 मिनिटांनी हे ग्रहण समाप्त होईल. ग्रहणाचा मध्य म्हणजेच सर्वात विलोभनीय क्षण सायंकाळी पाच वाजून 42 मिनिटांनी अनुभवता येईल. अंटार्कटिकाच्या दुर्गम भागात हे ‘रिंग ऑफ फायर’ पूर्णपणे स्पष्ट दिसेल, तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही भागांतून अंशतः ग्रहण पाहता येईल.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: हुडहुडी गायब, उकाडा वाढला; महाराष्ट्रात निसर्गाचे 'अजब' रूप; थंडीच्या महिन्यात पावसाचे सावट

भारतातील खगोलप्रेमींच्या पदरी मात्र यावेळी थोडी निराशा पडण्याची शक्यता आहे. हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे येथील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’चा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही. तथापि, इंटरनेट आणि NASAच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा नजारा घरबसल्या पाहता येईल. भारतात हे ग्रहण दृश्यमान नसल्याने, धार्मिक दृष्टिकोनातून पाळला जाणारा ‘सूतक काळ’ (वेध) पाळण्याची आवश्यकता नसेल, असे जाणकारांचे मत आहे.

विज्ञानाच्या दृष्टीने हे ग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात सूर्याच्या बाह्य थराचा अभ्यास करण्याची संशोधकांना मोठी संधी मिळते. “सुवर्ण कंकणासम” दिसणारे हे सूर्यग्रहण केवळ काही मिनिटांसाठीच टिकते, मात्र त्याचा प्रभाव आणि त्यावेळचे निसर्गातील बदल थक्क करणारे असतात. पक्ष्यांचा किलबिलाट अचानक थांबणे किंवा तापमानात होणारी घट असे बदल यावेळी प्रकर्षाने जाणवतात.

2026 मध्ये एकूण दोन सूर्यग्रहण होणार असून, दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी दिसेल. फेब्रुवारीत होणारे हे पहिले वलयाकार ग्रहण असेल, तर ऑगस्टमध्ये होणारे ग्रहण हे खग्रास (Total Solar Eclipse) असेल. विशेष म्हणजे, ग्रहणाच्या वेळी डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साध्या डोळ्यांनी ग्रहण पाहणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे सौर चष्म्यांचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

हेही वाचा: Horrific Road Accident: महामार्गावर मृत्यूचा थरार; ट्रक आणि इनोव्हाच्या धडकेत सहा ठार; कारचा अक्षरशः चक्काचूर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number