Tuesday, March 17, 2026 02:17:20 PM

Somvati Amavasya 2026 : यंदा सोमवती अमावस्येवर सूर्यग्रहणाचे सावट? 'या' 7 गोष्टींची घ्या विशेष खबरदारी!

सोमवती अमावस्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम तिथी मानली जाते. तसेच, या दिवशी महिला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून पतीसाठी दीर्घायुष्याचे वरदान मागतात.

somvati amavasya 2026  यंदा सोमवती अमावस्येवर सूर्यग्रहणाचे सावट या 7 गोष्टींची घ्या विशेष खबरदारी

Somvati Amavasya 2026 : हिंदू धर्मात सोमवारी येणाऱ्या अमावस्येला 'सोमवती अमावस्या' म्हटले जाते आणि तिला विशेष धार्मिक महत्त्व आहे. 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीनंतर लगेचच हा शुभ योग येत असून, यंदा त्यावर सूर्यग्रहण आणि पंचकाचे सावट असल्याने हा काळ अधिक संवेदनशील मानला जात आहे.

सोमवती अमावस्या 2026 : तारीख आणि वेळ
यंदा सोमवती अमावस्येनिमित्त 16 फेब्रुवारी 2026 रोजी पूजन आणि धार्मिक विधी केले जातील. पंचांगानुसार, अमावस्या तिथीची वेळ खालीलप्रमाणे आहे:
अमावस्या तिथी प्रारंभ: 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 2:15 वाजता.
अमावस्या तिथी समाप्ती: 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:45 वाजता.
उदया तिथीनुसार: सोमवारी, 16 फेब्रुवारी रोजीच दान-धर्म आणि उपवास करणे शास्त्रोक्त ठरेल.

सूर्यग्रहण आणि पंचकाचा दुर्मिळ योग
सोमवती अमावस्येच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी, त्याचे ज्योतिषशास्त्रीय परिणाम महत्त्वाचे मानले जातात. तसेच, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:05 वाजता 'अग्नी पंचक' सुरू होत आहे. अमावस्या, ग्रहण आणि पंचक असा दुर्मिळ योगायोग असल्याने 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

हेही वाचा - Grahan 2026 : 15 दिवसांच्या अंतराने नशिबाची चक्रं फिरणार! फेब्रुवारी-मार्चमधील दोन ग्रहणे 'या' 4 राशींना देणार बक्कळ पैसा

पितृदोष मुक्ती आणि पूजा विधी
सोमवती अमावस्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम तिथी मानली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात.
स्नान आणि दान: सकाळी सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरात अंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी घालून त्याने अंघोळ करावी. त्यानंतर गरिबांना काळे तीळ, धान्य किंवा कपड्यांचे दान करावे.
पितृ तर्पण: दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने जल अर्पण केल्यास त्यांचे आशीर्वाद लाभतात.
मंत्र जप: या काळात 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप केल्याने ग्रहणाचे आणि पंचकाचे नकारात्मक प्रभाव कमी होतात.

सावधान! विसरूनही 'या' चुका करू नका
अमावस्या आणि पंचकाच्या काळात काही कामे वर्ज्य मानली जातात, अन्यथा आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते:
नवीन सुरुवात टाळा: कोणताही नवीन व्यवसाय, करार किंवा मोठा आर्थिक व्यवहार या काळात करू नका.
दक्षिण दिशेला प्रवास: अमावस्येला आणि पंचकात दक्षिण दिशेचा प्रवास अशुभ मानला जातो.
घराची कामे: नवीन घर बांधणी, घराचे छत टाकणे किंवा लाकूड खरेदी करणे टाळावे; यामुळे वास्तूदोषाची भीती असते.
खरेदीवर मर्यादा: पलंग, गादी किंवा खाट खरेदी करणे या काळात निषिद्ध आहे.
झाडांची तोड: अमावस्येला झाडे कापू नयेत किंवा तुळशीची पानेही तोडू नयेत.

हेही वाचा - Surya Grahan 2026 : 17 फेब्रुवारीला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार का? जाणून घ्या ग्रहणाची वेळ आणि राशींवरील परिणाम

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री