रविवारी 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषक विजेतेपद जिंकून प्रथमच चॅम्पियन बनून इतिहास रचला. टीम इंडिया केवळ विश्वविजेतीच झाली नाही तर विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कमही जिंकली.
भारतीय संघाला 8 वर्षांपूर्वी वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडकडून हृदयद्रावक पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण यावेळी टीम इंडियाला स्वतःच्याच भूमीवर स्वतःच्या लोकांमध्ये विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची संधी होती आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने निराश केले नाही. रविवारी खेळल्या गेलेल्या या विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच विश्वविजेता बनला.
हेही वाचा - India Win World Cup 2025 : हरमनप्रीतच्या winning कॅचनं भारताचं स्वप्न साकार, महिला क्रिकेट संघानं कोरलं वर्ल्ड कप 2025 वर नाव
भारतीय संघाला मिळाली इतकी रक्कम :
या विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वीच, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आणि स्पर्धेच्या बक्षीस रकमेत प्रचंड वाढ केली आणि टीम इंडिया पहिला विजेता ठरला. विश्वविजेते बनल्याबद्दल, टीम इंडियाला आयसीसीकडून 4.48 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 40 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पुरुष किंवा महिला क्रिकेटच्या इतिहासात दिलेली ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे.
एवढेच नाही तर इतर संघांप्रमाणे भारतीय संघालाही पूर्वनियोजित रक्कम 2.5 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.22 कोटी रुपये मिळतील. याशिवाय, टीम इंडियाला लीग टप्प्यात जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी 34,314 डॉलर मिळतील. टीम इंडियाने लीग टप्प्यात तीन सामने जिंकले आणि अंदाजे 92 लाख रुपये अतिरिक्त कमावले.
हेही वाचा - Indian Women's Cricket Team: भारताचा पहिला महिला वर्ल्ड कप विजय! पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
दक्षिण आफ्रिकादेखील मालामाल:
दक्षिण आफ्रिकेला जेतेपद पटकावता आले नाही पण त्यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी उपविजेती बक्षीस रक्कमही जिंकली. दुसरे स्थान मिळवल्याबद्दल आफ्रिकन संघाला 2.24 डॉलर किंवा सुमारे 20 कोटी रुपये मिळाले. याशिवाय, आफ्रिकन संघाला 2.22 कोटी रुपये पूर्वनियोजित रक्कम मिळेल. आफ्रिकन संघाने लीग टप्प्यात पाच सामने जिंकले आणि त्यामुळे त्यांना प्रति सामना 34,314 डॉलर या दराने 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.