दिवाळी तोंडावर, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं काय होणार? प्रताप सरनाईकांचे महत्त्वाचे आदेश

ST employees Diwali salary 2026 : दिवाळीचा सण जवळ येत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सणासुदीच्या काळात वेतन वेळेवर मिळणार की नाही, याकडे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
एसटी कर्मचारी वेतन,
ST Employees Salary

महाराष्ट्रामधील साधारण 83 हजार एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. यंदाची दिवाळी गोड व्हावी यासाठी नोव्हेंबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वीच देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत.

दिवाळीआधी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार?
साधारणपणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या सात ते दहा तारखेच्या दरम्यान होऊन जातो. पण यंदा 6 नोव्हेंबरपासून दिवाळी हा सण सुरु होत आहे. यामुळे सणाच्या खरेदीसाठी आणि कुटुंबाच्या खर्चासाठी कर्मचाऱ्यांना वेळेमध्येच पगार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेता मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आता तातडीने पावले उचलण्यास सांगितले आहेत. यासाठी एसटीच्या अर्थ आणि नियोजन विभागाने शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.

हेही वाचा- छत्रपती संभाजीनगरहून गोव्याला जाणारी विमानसेवा अवघ्या 24 दिवसांत बंद; प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग खुलासा

अनुदानासाठी शासनाकडे धावपळ
पगारासाठी लागत असलेले अनुदान आणि अनेक सवलत योजनांचे शासनाकडून येणे बाकी असल्यामुळे पैसे लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. महामंडळाच्या आर्थिक अडचणीचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या सणावर होऊ नये, यालाचा सर्वोच्च प्राधान्य द्यावे. निधीसाठी शासनाशी समन्वय साधत दिवाळीपूर्वी पगार कसा होईल याचे नियोजन करावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केलेले आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version