मुंबई : सध्याला राज्यभरात बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण चांगलंच गाजतंय. आणि अशातच या प्रकरणावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. सुरेश धस यांनी स्पष्ट केले की, "मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. त्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी मागे असलेल्या देवगिरी बंगल्यातील लोकांची आहे." त्यांनी बीडमधील नैतिकतेसंदर्भातही भाष्य करत सांगितले की, "बीडमध्ये नैतिकता नाही, मात्र मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही."
👉👉 हे देखील वाचा : मुख्यमंत्री आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये 45 मिनिटे चर्चा, फडणवीसांनी काय दिले आदेश ?
सुरेश धस यांनी त्यांच्या मतदारसंघात उपसा सिंचन योजनेसाठी निधीची घोषणा करण्यात आल्याचा उल्लेख केला आणि त्यासाठी भूसंपादनाचे पैसे लवकर मिळावेत याकरता अजित पवारांची भेट घेतल्याचे सांगितले.
तसेच, सुरेश धस यांनी वाल्मिक कराड प्रकरणावर सखोल भाष्य केले. "वाल्मिक कराड हे एक गंभीर प्रकरण आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात गॅग तयार करण्याचे काम केले असून, त्या गॅगला मोक्का लावणे आवश्यक आहे. भविष्यात जे तिहार जेलमध्ये होतंय, ते मुंबईत सुरू आहे आणि हे महाराष्ट्रभरात होईल," असे ते म्हणाले.
👉👉 हे देखील वाचा : बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ?
वाल्मिक कराड यांच्या संदर्भात त्यांनी आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. "काही पतसंस्था बुडाल्या असून त्यात कराडांचा संबंध आहे. त्यावेळी खाडे नावाचा पोलिस अधिकारी संबंधित आढळला आणि त्यांच्या घरी कॅश सापडली," असे त्यांनी सांगितले. यासोबतच, "वाल्मिक कराड यांनी डिफेंडर गाडी घेतली आणि त्यांना धनंजय मुंडे यांनी पाठीशी घातले हे उघड आहे," असा गंभीर आरोप केला.
👉👉 हे देखील वाचा : 'बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलणार' पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट
पंकुताईंनी ७४५ शिक्षकांची भरती केली, पण यावेळी सर्व नियम धाब्यावर ठेवून नोकऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याचे धस यांनी स्पष्ट यावेळी केले.
सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे राजकारणात नवीन वाद उभा राहण्याची दाट शक्यता आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.