बीड : हत्याप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अजित पवारांनी मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी थेट मागणी होतेय. यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना पुरावा नसल्याने कारवाई नाही असा पवित्रा घेतला आहे.
अजित पवार यांचे मत
धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, या प्रकरणात सीआयडी, एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही.
सरकारनं संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे.
नैतिकतेच्या आधारावर दिलेले राजीनामे
अजित पवार यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्याच्या राजकारणात नैतिकतेच्या आधारावर आजवर अनेक नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्याच्या इतिहासातील नैतिकतेच्या आधारावर दिलेले राजीनामे पुढीलप्रमाणे:
बॅ. अब्दुल रहेमान अंतुले (मुख्यमंत्री): सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला.
बॅ. रामराव आदिक (उपमुख्यमंत्री): एअर होस्टेसची छेडखानी केल्याचा आरोप झाल्यावर राजीनामा दिला.
शिवाजीराव पाटील-निलंगेकर (मुख्यमंत्री): मुलीचे गुण परिक्षेत वाढवल्याचा आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला.
मनोहर जोशी (मुख्यमंत्री): जावयाच्या बांधकाम प्रकरणामुळे राजीनामा दिला.
अशोकराव चव्हाण (मुख्यमंत्री): ‘आदर्श’ प्रकरणी आरोप झाल्यावर राजीनामा दिला.
विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील: 26/11 च्या हल्ल्यानंतर राजीनामा दिला.
छगन भुजबळ: तेलगी प्रकरणी आरोप झाल्यावर राजीनामा दिला.
बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन: आरोप झाल्यावर राजीनामे दिले.
अजित पवार (उपमुख्यमंत्री): सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला.
सध्याच्या परिस्थितीत काय घडत आहे?
नैतिकतेच्या आधारावर राजीनामे देणे हा त्या मंत्र्यांचा वा नेत्यांचा स्वतःचा अधिकार आहे. ज्याने-त्याने सद्सद्विवेक बुद्धिच्या आधारावर हा निर्णय घ्यायचा असतो.
अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी आपण राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोपांवरील चर्चा काय ?
आरोप झाल्यावर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा.
राज्यातील अनेक मंत्र्यांनी गुन्हा सिद्ध होण्याची वाट पाहिली नाही.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव.
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही.
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी काय सांगितले ?
सुरेश धस यांनी नुकतीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 45 मिनिटे चर्चा केल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी
विजय वाकडे: “ते माझे मित्र होते, जेव्हा मी पालकमंत्री होतो, परभणीतील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मृत्यू झाला. हे मी सभागृहात सुद्धा सांगितले.”
संतोष देशमुख कुटुंबाशी चर्चा: “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी भेट घेतली आहे. सरकारच्या धोरणानुसार, त्यांचा मुलगा शासनात स्थान घेण्याबाबत चर्चा झाली आहे.”
नाव काढण्याचा निर्णय: “जे लोक या घटनेशी संबंधित नाहीत, त्यांची नाव यादीतून काढली जाईल. अनुकंपा धारक असलेल्या व्यक्तींच्या विरुद्ध कारवाई होईल.”
धनंजय देशमुख: “जे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे, त्याबद्दल मी समर्थन करतो. CDR तपासण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे.”
संतोष देशमुखचा व्यवसाय : "संतोष देशमुख 2019 मध्ये पंकजा ताईंचे बूथ प्रमुख होते, आणि आता नमिता मुंदडा यांच्या बुथचे प्रमुख होते. दोषी असलेल्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल."
शासनाच्या कार्यवाहीची ग्वाही: “संतोषच्या पत्नीला शासनाच्या सेवेत घेण्यात येईल आणि लातूरमध्ये त्यांचे पोस्टिंग करण्यात येईल.”
SIT चौकशी आणि CDR तपासणी: “SIT मध्ये बदल करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत, ज्यावर दोन दिवसांत कारवाई होईल. CDR चा तपासणी होईल, आणि कोण काय बोलले ते तपासले जाईल.”
गुन्हेगारावर कारवाई: “कोणतेही गुन्हेगार असो, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. काही व्यक्तींवर ट्रॅक्टर चोरांचे गुन्हे दाखल आहेत.”
अजित पवार आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित काय म्हणाले ?
सुरेश धस यांनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर केलेल्या आरोपांबद्दल स्पष्ट केले की, “हा प्रश्न अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचा आहे. मी एवढा मोठा नाही.”
त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात कार्यवाहीसाठी सकारात्मक भूमिका घेतली असून, सरकारने योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.