काश्मीरच्या पूंछ इथं अतिरेकी हल्ला

जवान छावणीकडे जात असताना हा हल्ला झाला, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागात ही घटना घडली, तेथे गेल्या वर्षी अनेक दिवस दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरू होती. पूँछ जिल्ह्यातील भटादुरियान भागात लष्करी वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे गाडीने पेट घेतला त्या आगीत जवान जळून खाक झाले. एक जवान गंभीर […]

काश्मीरच्या पूंछ इथं अतिरेकी हल्ला

जवान छावणीकडे जात असताना हा हल्ला झाला, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागात ही घटना घडली, तेथे गेल्या वर्षी अनेक दिवस दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरू होती. पूँछ जिल्ह्यातील भटादुरियान भागात लष्करी वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे गाडीने पेट घेतला त्या आगीत जवान जळून खाक झाले. एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला एअरलिफ्ट करून लष्करी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. शहीद झालेल्यांमध्ये चार जवान पंजाबचे तर एक ओडिशाचा आहे. हल्लेखोरांची संख्या चार ते पाच असल्याचे सांगण्यात येत आहे.

परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे. पुढील महिन्यात 22 ते 24 मे दरम्यान श्रीनगरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर लष्कराला सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.ज्या भागात ही घटना घडली होती त्याच भागात 14 ऑक्टोबर 2021 रोजी शोध मोहीम राबवत असलेल्या जेसीओसह चार जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यात चारही जवान शहीद झाले होते. त्यानंतर जवळपास महिनाभर या भागात सुरक्षा दलांची मोहीम सुरू होती, मात्र एकही दहशतवादी पकडला गेला नाही.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. शूर जवानांचे हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही, असे ते म्हणाले. मी पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. या घटनेवर शोक व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, कर्तव्य बजावताना पाच जवान शहीद झाल्याची बातमी दुःखद आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number