Thursday, November 13, 2025 08:08:36 AM

Gautam Gambhir on Harshit Rana: 'हे अत्यंत लाजिरवाणे...'; हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर गौतम गंभीरचा संताप

युवा गोलंदाज हर्षित राणा याच्या सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर गंभीर यांनी संताप व्यक्त करत काही माजी खेळाडूंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

gautam gambhir on harshit rana हे अत्यंत लाजिरवाणे हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर गौतम गंभीरचा संताप

Gautam Gambhir on Harshit Rana: भारताने वेस्ट इंडिजवर 2-0 असा विजय मिळवत कसोटी मालिका जिंकली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा संताप सर्वाधिक चर्चेत राहिला. युवा गोलंदाज हर्षित राणा याच्या सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर गंभीर यांनी संताप व्यक्त करत काही माजी खेळाडूंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. गंभीर यांनी म्हटलं की, '23 वर्षांच्या तरुण खेळाडूवर विनाकारण टीका करणे लाजिरवाणे आहे. हर्षितचे वडील माजी क्रिकेटपटू किंवा निवड समितीचे अध्यक्ष नाहीत. त्याने स्वतःच्या मेहनतीवर आपली ओळख निर्माण केली आहे. फक्त YouTube वर व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुण खेळाडूंना लक्ष्य करणे चुकीचे आहे.'

हेही वाचा - India vs West Indies Test Series : भारतानं वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी मालिका 2-0 नं जिंकली

गंभीर यांनी नाव न घेता माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांच्यावरही निशाणा साधला. श्रीकांत यांनी अलीकडे त्यांच्या YouTube चॅनेलवर म्हटले होते की, हर्षित राणा हे गंभीरच्या संघातील पहिले नाव आहे. ही टिप्पणी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हर्षितला ट्रोल करण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना गंभीर म्हणाले, जर उद्या तुमचा मुलगा क्रिकेट खेळेल आणि त्याला सोशल मीडियावर शिवीगाळ केली जाईल, तर कसं वाटेल? माझ्यावर टीका करा, पण एका तरुणावर असे हल्ले करणे अमान्य आहे.

हेही वाचा - Vaibhav Suryavanshi: फक्त 14 वर्षांच्या मुलाकडे संघाची मोठी जबाबदारी; वैभव सूर्यवंशी दिसणार नव्या भूमिकेत

गंभीर यांनी पुढे सांगितले की, भारतीय क्रिकेटमधील प्रत्येकाला तरुण खेळाडूंविषयी जबाबदारीने वागायला हवे. अशा ट्रोलिंगमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास कमी होतो. दरम्यान, श्रीकांत यांनी नितीशकुमार रेड्डी यांच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, हर्षित आणि नितीश दोघांनीही बॉर्डर-गावस्कर मालिकेत प्रभावी कामगिरी केली आहे. गंभीर यांच्या वक्तव्यानंतर या वादावर क्रिकेट वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.


सम्बन्धित सामग्री