Saturday, July 20, 2024 12:37:45 PM

Tragedy in the making of reels
रिल्स बनवण्याच्या नादात दोन विद्यार्थी ठार

नागपूरमध्ये रिल्स बनवण्याच्या नादात धक्कादायक घटना घडली आहे.

रिल्स बनवण्याच्या नादात दोन विद्यार्थी ठार

नागपूर : तरूणांमध्ये रिल्स व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या रिल्सच्या माध्यामातून तरूणाई स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून रिल्स बनवताना दिसते. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडीतील पांजरा येथे मंगळवारी मध्यरात्री चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी अनियंत्रित झाली आणि सहा बॅरिकेड्स तोडून दुभाजकावर जोरात आदळली. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

https://www.instagram.com/reel/C9OxAc-iyn3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA%3D%3D

 

अपघात झालेले पाच जण मित्र होते. अपघातापूर्वी बनवलेली रिल इंस्टाग्रामवर आहे. मात्र गाडी कोण चालवत होता ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही. रिल्स बनवण्याच्या नादात नागपूरमध्ये ही दुर्देवी घडलेली घटना आहे.    

 

           

सम्बन्धित सामग्री