Emergency Landing: विमान अपघाताचा मोठा थरार! टेक ऑफवेळी इंजिन बंद पडले अन्…

अमेरिकेतील डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जपानकडे जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग 777 विमानाचे उड्डाणानंतर एक इंजिन बंद पडले. वैमानिकांनी

Emergency Landing: विमान अपघाताचा मोठा थरार! टेक ऑफवेळी इंजिन बंद पडले अन्…

आकाशात झेप घेत असलेलं विमान, आत बसलेले शेकडो प्रवासी आणि अचानक थांबलेलं इंजिन… काही क्षणांसाठी मृत्यू अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहिला. अमेरिकेतील डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेली ही घटना मोठ्या विमान दुर्घटनेत रूपांतर होणार होती, मात्र वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे ती थरारक पण सुखरूप शेवटाकडे वळली.

अमेरिकेहून जपानकडे जाणारे युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 777-200 हे विमान 275 प्रवासी आणि 15 क्रू सदस्यांसह टेकऑफ घेत होते. विमान धावपट्टी सोडून हवेत झेपावत असतानाच अचानक एका इंजिनने काम करणे बंद केले. क्षणभर संपूर्ण विमानात भीतीचं सावट पसरलं. परिस्थितीची गंभीरता ओळखताच वैमानिकांनी तात्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर केली. नियम आणि प्रशिक्षणानुसार सर्व सुरक्षा प्रक्रिया राबवत विमानाला हवेतच नियंत्रित करण्यात आलं. काही मिनिटांचा तो काळ प्रवाशांसाठी अत्यंत तणावपूर्ण होता. अखेर वैमानिकांनी धाडसी निर्णय घेत यू-टर्न घेतला आणि विमानाला पुन्हा डलेस विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात यश मिळवलं.

हेही वाचा: PM Modi 3 Nation Visit: पंतप्रधान मोदींचा तीन देशांच्या दौऱ्यावर; जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानसोबच्या संबंधांना मिळणार अधिक बळकटी

लँडिंगदरम्यान इंजिन बंद पडल्यामुळे धावपट्टीवर किरकोळ आग लागली, मात्र अग्निशमन दलाने क्षणात ती आटोक्यात आणली. या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आलं. युनायटेड एअरलाइन्सने वैमानिक आणि क्रू मेंबर्सच्या संयम, कौशल्य आणि तत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने या घटनेची गंभीर दखल घेत इंजिन बिघाडाच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. विमानाचा डेटा रेकॉर्डर आणि मेंटेनन्स लॉग्सची सखोल तपासणी केली जात आहे.

या थरारक घटनेमुळे अनेकांच्या मनात काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेची आठवण ताजी झाली. त्या वेळी एअर इंडियाच्या विमानाची दोन्ही इंजिन उड्डाणानंतर बंद पडली होती. वैमानिकांकडे प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळच नव्हता आणि विमान थेट रहिवासी भागात कोसळले होते. त्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. डलेस विमानतळावरील ही घटना एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करून जाते, आकाशात काही सेकंदांचा निर्णय, शेकडो जीव वाचवू शकतो. आज ही घटना ‘मोठी शोकांतिका’ ठरली नाही, मात्र विमान सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा जागे करून गेली आहे.

हेही वाचा: Gold Rate Today: आज सोनं-चांदीच्या भावाने गाठला नवा उच्चांक; आजचे दर काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number