Vat Purnima 2025: सुखी वैवाहिक जीवन, पतीचे दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जाणारा वट सावित्री पौर्णिमा व्रत हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. 2025 मध्ये हा व्रत 11 जून रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात आणि सावित्री-सत्यवान यांची पौराणिक कथा ऐकतात.
पण या व्रताचे खरे फळ मिळवायचे असेल, तर काही विशेष नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असते. चुकीच्या पद्धतीने केलेले व्रत फळदायी न ठरता निष्फळ होऊ शकते. त्यामुळे व्रत करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणे गरजेचे आहे.
वट सावित्री पौर्णिमा 2025 ची तिथी: वैदिक पंचांगानुसार, पूर्णिमा तिथी 10 जून रोजी सकाळी 11:35 वाजता सुरू होईल आणि 11 जून दुपारी 1:13 वाजता समाप्त होईल. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार व्रत 10 जून रोजी ठेवले जाईल, तर स्नान-दान 11 जून रोजी होईल.
हेही वाचा: Weekly Horoscope 8 June to 14 June 2025: साप्ताहिक राशिभविष्य; कोणत्या राशीचा मार्ग मोकळा, कोणाला करावा लागेल संघर्ष? जाणून घ्या
व्रताचे महत्वाचे नियम; फळ हवे असल्यास ‘या’ गोष्टी पाळाच
-16 शृंगार: व्रत करणाऱ्या स्त्रीने पारंपरिक सोलह शृंगार करणे आवश्यक आहे. यामुळे देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात.
-सात्विक आहार: व्रताच्या आदल्या दिवशी फक्त सात्विक व हलका आहार घ्यावा. मसालेदार, लसूण-पिठाच्या पदार्थांपासून दूर राहा.
-शुद्धता ठेवा: शरीर, मन आणि वस्त्र या तिन्ही पातळ्यांवर शुद्धता राखणे गरजेचे आहे.
-सकाळी लवकर स्नान: व्रताच्या दिवशी सूर्योदयाआधी स्नान करून स्वच्छ साडी परिधान करा.
-पूजेमध्ये तमसिक वस्तूंना नकार: कांदा, लसूण, मांसाहार व मद्य हे पूजेसाठी वर्ज्य आहे.
-ब्रह्मचर्य पाळा: या दिवशी शारीरिक संबंध वर्ज्य आहेत. ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे.
-सकारात्मक विचार ठेवा: मनात कोणताही राग, द्वेष किंवा नकारात्मकता बाळगू नका.
-वडाची पूजा: वडाच्या झाडाभोवती सुत्र फिरवून पूजा करा व नमस्कार करून आशीर्वाद घ्या.
-कथा श्रवण करा: व्रतानंतर सत्यवान-सावित्रीची कथा ऐकणे अत्यंत आवश्यक आहे.
-व्रत पारणानंतरही सात्विक आहार: व्रत संपल्यावरही फक्त सात्विक व शुद्ध अन्नच सेवन करा.
-ब्राह्मण भोज व दक्षिणा: व्रताच्या समाप्तीनंतर ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा देणे पुण्यकारक ठरते.
-मनाची निर्मळता जपा: व्रताच्या प्रत्येक क्षणी मन:शांती, भक्तीभाव आणि श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे.
-क्रोध टाळा: व्रताच्या दिवशी शांत राहणे हेच खरे व्रताचे लक्षण आहे.
हेही वाचा:Vat Purnima 2025: आर्थिक संकट दूर होऊन होईल भरभराट; वटपौर्णिमेला महिलांनी दान कराव्या 'या' 3 गोष्टी
वट सावित्री व्रत हे फक्त परंपरा म्हणून न मानता, श्रद्धा व शुद्ध भावनेने केले गेले तरच त्याचा खरा लाभ मिळतो. या नियमांचे पालन करून प्रत्येक स्त्री आपल्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे शुभफळ नक्कीच अनुभवू शकते. तर या वट सावित्री पौर्णिमेला करा नियमांचे पालन आणि मिळवा अखंड सौभाग्याचे वरदान.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)