दसरा-दिवाळीच्या तोंडावर एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. बाजारात कांद्याची आवक घटल्याने आगामी काळात कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीपर्यंत कांद्याच्या दरात तब्बल 50 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचा दर शंभर रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो, असे झाल्यास ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
कांदा महागण्याचं कारण काय?
सध्या बाजारात कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे आवक घटणे.कांद्याची आवक कमी झाल्याचा थेट परिणाम बाजारातील दरावर होतो. बाजारात माल कमी आला की मागणी वाढते आणि दर आपोआप वाढतात.
कांद्याचे दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचल्यास त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना होणार आहे. जर सणासुदीत 50 टक्क्यांपर्यंत कांद्याच्या दरांत वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला चांगलाच धक्का बसणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.