घरात रंगकाम सुरु असल्याने काही कामगारांची ये-जा सुरु होती. मात्र, घराचं सौंदर्य वाढवून त्याच घरात सुखी संसार करण्याचं हेच काम एका कुटुंबाच्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन येईल, याची कुणालाही जराही कल्पना नव्हती. रंगकामाच्या निमित्ताने घरात आलेल्या एका तरुणामुळे अवघ्या 10 वर्षांच्या संसाराचा असा धक्कादायक शेवट होईल, याचा विचारही कुणी केला नसेल. नेमकं या घरात काय घडलं? या घटनेमागचं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
मालकाच्या पत्नीशी सूत जुळलं
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विजयपुरा येथील संपूर्ण घटना आहे. वियजुपरा येथील एकतानगर येथे राहत असलेल्या 42 वर्षीय राजशेखर बिरादर यांनी या परिसरात नवे घर बांधले होते. या घराच्या रंगकामासाठी त्यांनी आनंद या 25 वर्षीय तरुणाला बोलावले होते.
राजेशख हे या परिसरात आपली पत्नी अश्विनी आणि त्यांच्या सहा वर्षांच्या जुळ्या मुलांसोबत राहत होते. लग्नाला 10 वर्ष झाली होती. मात्र, या पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत होती, अशी माहिती समोर आलेली आहे. नवीन घरात जाताच पुन्हा सुखी संसाराला सुरुवात करायची, त्यामुळे राजशेखर आनंदी होती. मात्र, रंगकामानिमित्ताने आनंद आणि अश्विनीचे बोलणे वाढत गेले. त्यातून काही दिवसांत त्यांची चांगली मैत्री झाली. पाहता पाहत हीच मैत्री प्रेमसंबंधात बदलली, असा पोलिसांचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजशेखर यांच्या पत्नीला त्यांच्यापासून सुटका हवी होती. याबाबत तिने चक्क रंगकाम करणाऱ्या आनंदशी ही चर्चा केली होती आणि त्यानंतरच दोघांनी मिळून राजशेखर यांना संपवण्याचा कट रचला, असा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी कट रचताना राजशेखर यांच्या मृ्त्यूला रस्ते अपघाताचे स्वरुप देण्याचा निर्णय घेतला.
कशी केली हत्या?
4 ऑक्टोबर रोजी साधारण सकाळी राजशेखर हे त्यांच्या सवयीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडले. सकाळी ते साधारण साडेपाच वाजता राजशेखर हे जुमिनाल रस्त्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्याच वेळी अश्विनीने अर्थात राजशेखर यांच्या पत्नीने आनंदला राजशेखर यांचे लोकेशन दिले. त्यानंतर आनंद दुचाकीवरुन राजशेखर यांच्या पाठी गेला आणि आपल्या साथीदारांनाही त्यांनी माहिती दिली.
आरोपींनी नंबर प्लेट नसलेल्या एका कारने राजशेखर यांना मागून धडक दिली. याच धडकेत ते गाडीखाली येत चिरडले गेले आणि त्याच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर गाडीतील व्यक्तींनी तेथून पळ काढला. पोलिसांना सुरुवातीला हा प्रकार अपघात करत पळ काढल्याचे वाटत होते. धक्कादायक म्हणजे, आपल्याच पतीला मारण्याच कट रचून, अश्विनीने पोलिसांत जात तक्रार दाखल केली होती.
पतीच्या मृत्यूमागचं गूढ पोलिसांनी उलगडलं
पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरु केला. पोलिसांना पहिल्यांदा सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यात एक दुचाकी दिसून आली आणि धडक दिलेल्या कारचे नंबर प्लेट नसल्याचेही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराची चौकशी केली. या चौकशीतून आणि तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे आरोपींचा या प्रकरणात काय सहभाग होता, हे समोर येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अश्विनी, तिचा प्रियकर आनंद आणि सचिन तसेच एरा अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. राजशेखर यांच्या मृत्यूला सुरुवातील अपघात समजले जात होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज, चौकशी आणि तपासून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.