Car Care In Summer : उन्हाळा सुरू झाला आहे आणि अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा चढत आहे. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेण्यासोबतच एसीपासून ते वाहनांपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. अशा कडक उन्हाळ्यात माणसांसोबतच वस्तूंवरही परिणाम होत असतो. तेव्हा, उन्हाळ्यात काही वस्तू चुकूनही तुमच्या कारमध्ये ठेवू नका. या गोष्टींमुळे उन्हात पार्क केलेल्या तुमच्या कारमध्ये स्फोट होऊ शकतो. शिवाय, शक्यतो कार उन्हात पार्क करणे टाळावे. पण पर्यायच नसल्यास पुढील काळजी घ्यावी.
लायटर
कारमध्ये लायटर किंवा तत्सम ज्वालाग्राही वस्तू ठेवू नये. लायटर बराच वेळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आला तर लायटरचा स्फोट होऊ शकतो. ज्यामुळे कारमध्ये आग लागू शकते.
सॅनिटायझर
कारमध्ये सॅनिटायझर ठेवू नये. प्रखर सूर्यप्रकाश त्यावर पडतो तेव्हा आगीचा धोका वाढतो. सॅनिटायझरमुळे तुमच्या कारमध्ये मोठा स्फोट होऊ शकतो.
हेही वाचा - माठ खरेदी करताना 'या' गोष्टी महत्त्वाच्या; नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
गॅस कॅनिस्टर
तुम्ही कारमध्ये गॅस कॅनिस्टर ठेवत असाल तर, तो सर्वात आधी कारमधून बाहेर काढा. कारण, आता उन्हाळा सुरू झाला आहे. गॅस कॅनिस्टर प्रखर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास स्फोट होण्याची व आग लागण्याची भीती असते.
कारमध्ये परफ्यूम ठेवू नये
कारमध्ये परफ्यूम केव्हाही ठेवू नये. परफ्यूममध्ये अल्कोहोल असते जे उष्णतेमध्ये गॅसमध्ये बदलू शकते आणि बाटलीच्या आत दाब निर्माण होऊ शकतो. थेट सूर्यप्रकाश परफ्यूमच्या बाटलीवर पडला तर त्यातून वायू निर्माण होऊ शकतो आणि स्फोट होऊ शकतो.
पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
बरेच लोक कारमध्ये पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ठेवतात. पण ही चूक महागात पडू शकते. खरं तर, रिकामी बाटली तेजस्वी सूर्यप्रकाशात लेन्सप्रमाणे काम करते. जेव्हा ती गरम होते तेव्हा ती वितळू लागते, ज्यामुळे आग लागू शकते. अशी शक्यता फारच कमी असते. तरी देखील आपण काळजी घ्यायला हवी.
कुलंट
कारमध्ये कुलंट कमी असल्यास इंजिनवरील भार वाढतो, त्यामुळे कार अधिक गरम होते. त्यासाठी कारमधील कूलंटचं प्रमाण नियमित तपासत राहा.
उन्हाळ्यात गरम हवेमुळे कारच्या आत उच्च दाब निर्माण होतो. यामुळे काचा फुटू शकतात किंवा काचांना तडे जाण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही तुमची कार उन्हात उभी केली असेल किंवा वातावरणात उष्णता फार असेल तर, कारची खिडकी थोडीशी उघडी ठेवा जेणेकरून आतली गरम हवा बाहेर पडू शकेल.
हेही वाचा - उष्माघात होणं टाळायचंय? मग हे सोपे घरगुती उपाय करा; उन्हाळ्यात राहील थंडावा
(Disclaimer : ही माहिती केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठी दिली आहे. विविध शक्यतांचा विचार करून सावध राहणे आवश्यक आहे. जय महाराष्ट्र कोणत्याही नुकसानास जबाबदार नाही.)