दिवाळी गिफ्टसाठी बजेट किती? 500, 1,000 आणि 5,000 रुपयांपर्यंतच्या गिफ्ट्ससाठी जाणून घ्या बेस्ट पर्याय

दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, साफसफाई, नवीन कपडे, रांगोळी, मिठाई आणि आनंदाचा उत्सव. या उत्सवात भेटवस्तूंची देवाण-घेवाण हा एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र, दरवर्षी गिफ्ट काय द्यायचं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. बाजारात महागड्या वस्तूंचे असंख्य पर्याय उपलब्ध असताना, बजेटमध्ये बसेल आणि समोरच्या व्यक्तीला आवडेल असे गिफ्ट शोधणे खरंच कठीण होऊन बसते.
दिवाळी गिफ्टसाठी बजेट किती? 500, 1,000 आणि 5,000 रुपयांपर्यंतच्या गिफ्ट्ससाठी जाणून घ्या बेस्ट पर्याय

दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, साफसफाई, नवीन कपडे, रांगोळी, मिठाई आणि आनंदाचा उत्सव. या उत्सवात भेटवस्तूंची देवाण-घेवाण हा एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र, दरवर्षी गिफ्ट काय द्यायचं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. बाजारात महागड्या वस्तूंचे असंख्य पर्याय उपलब्ध असताना, बजेटमध्ये बसेल आणि समोरच्या व्यक्तीला आवडेल असे गिफ्ट शोधणे खरंच कठीण होऊन बसते. त्यामुळे तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी 500, 1000 आणि 5000 रुपयांच्या बजेटमधील हे बेस्ट गिफ्ट पर्याय नक्की पाहा.

  1. 500 रुपयांच्या आतील गिफ्ट – कमी खर्चात जास्त आनंद – तुम्ही कमी बजेटमध्येही आकर्षक गिफ्ट देता येऊ शकतात.
  • कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसाठी: सुगंधी मेणबत्त्यांचा सेट (300 ते 450 रुपये), ड्रायफ्रूट्सचा छोटा जार, हाताने बनवलेले 6 दिव्यांचा सेट किंवा कस्टम फोटो फ्रेम हे उत्तम पर्याय आहेत.
  • बॉस आणि सहकाऱ्यांसाठी: ऑफिस डेस्कसाठी लकी प्लांट (350 रुपये), प्रीमियम कॉफीचा बॉक्स किंवा नाव असलेला पेन हा प्रोफेशनल आणि सुरक्षित पर्याय ठरेल.

    2. 1000 रुपयांच्या आतील गिफ्ट – सर्वांसाठी योग्य बजेट – हा बजेट सर्वसामान्यपणे अधिक वापरला जातो.

  • कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसाठी: कँडल, चॉकलेट आणि शुभेच्छा कार्ड असलेला हॅम्पर (799 रुपये), स्मार्ट LED लाईट, पारंपरिक झुमका बॉक्स किंवा काजू कतलीचा बॉक्स.
  • बॉस आणि टीमसाठी: लॅपटॉप स्लीव्ह किंवा प्रीमियम डायरी आणि पेन सेट. गिफ्ट कार्ड हा बॉससाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो.

हेही वाचा – धनत्रयोदशीला सोन्याऐवजी करा या 5 पर्यायांत गुंतवणूक; जाणून घ्या कुठे होऊ शकतो फायदा!

    3. 5000 रुपयांच्या आतील गिफ्ट – मोठं गिफ्ट – जरा जास्त बजेट असेल तर हे पर्याय नक्की आवडतील.

  • कुटुंबासाठी: स्मार्ट स्पीकर (3499 ते 4499 रुपये), घड्याळ, हेल्दी स्वयंपाकासाठी मिनी एअर फ्रायर किंवा लक्ष्मी-गणेश चांदीचे नाणे. हे गिफ्ट रोजच्या वापरात येते.
  • बॉस किंवा क्लायंटसाठी: ब्रँडेड परफ्युम, प्रीमियम ड्रायफ्रूट हॅम्पर किंवा कंपनीचे स्मार्टवॉच (3000 ते 5000 रुपये) किंवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलचे डिनर व्हाउचर.

एक्सपर्ट टीप

सणासुदीच्या काळात मिठाईचे बॉक्स सगळेच देतात, त्यामुळे 80 टक्के गिफ्ट्स री-गिफ्ट केले जातात. त्याऐवजी नाव असलेले पर्सनलाइज्ड गिफ्ट किंवा रोजच्या वापरात येणारे गिफ्ट दिल्यास ते जास्त काळ लक्षात राहते.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version