कर्जत : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज, 28 ऑक्टोबर रोजी कर्जत येथील पोलीस मैदानावर जाहीर सभा होत आहे. राज ठाकरे यांनी भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोडीविरोधात भूमिका घेत वृक्षतोड झालेल्या साय डोंगर परिसराची पाहणी केली. येथे 100 वर्षांहून जुनी झाडे मोठ्या प्रमाणावर कापण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या वृक्षतोडीमुळे स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. राज ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. सह्याद्री वाचवा या मोहिमेखाली राज ठाकरे सायंकाळी कर्जतच्या पोलीस मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी वृक्षतोडीच्या मुद्द्यावर परखड मत मांडत सरकारला खडेबोल सुनावले.