Friday, November 14, 2025 08:13:11 PM

कुत्रा चावलाय? सुरुवातीच्या 20 मिनिटांत करा 'हे' काम; संसर्गाचा धोका 99 टक्क्यांनी होईल कमी

देशभरात कुत्रा चावल्याची 37 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी केवळ रुग्णालयात दाखल झालेल्यांची आहे. यातून किती जणांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत, हे स्पष्ट नाही.

कुत्रा चावलाय सुरुवातीच्या 20 मिनिटांत करा हे काम संसर्गाचा धोका 99 टक्क्यांनी होईल कमी
Edited Image

Remedies After a Dog Bite: प्राचीन काळापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र मानला जातो. पण सध्या देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, सर्वोच्च न्यायालयालाही याची दखल घ्यावी लागली. न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांना भयावह आणि अत्यंत चिंताजनक म्हटले आहे. 

रेबीजमुळे होतो जीवघेणा संसर्ग - 

देशभरात कुत्रा चावल्याची 37 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी केवळ रुग्णालयात दाखल झालेल्यांची आहे. यातून किती जणांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत, हे स्पष्ट नाही. कुत्रा चावल्याने रेबीजचा धोका वाढतो. रेबीज एक असा संसर्ग आहे, जो एकदा मज्जातंतूंपर्यंत पोहोचल्यावर माणसाचा जीव घेऊ शकतो. विशेषतः लहान मुलांसाठी हे अधिक घातक ठरते. मुलांची उंची कमी असल्यामुळे कुत्रा चेहऱ्यावर किंवा डोक्याजवळ चावतो, आणि यामुळे संसर्ग मेंदूपर्यंत जलद पोहोचतो.

कुत्रा चावल्यानंतर काय करावे? 

कुत्रा चावल्यानंतर घाबरून जावू नका. कुत्रा चावल्यानंतर वेळेवर उपचार आणि काही खबरदारी घेण्याची गरज आहे. कुत्रा चावल्यानंतर जखम पूर्णपणे धुवून 99 % संसर्ग टाळता येतो. 15-20 मिनिटे वाहत्या पाण्यात जखम धुणे आवश्यक आहे. डेटॉल किंवा पोटॅशसारखे अँटीसेप्टिक लावा. 

हेही वाचा - Health Tips: औषधं फेल, पण 'भेंडीचं पाणी' पास; डायबिटीज कंट्रोलसाठी आजमावाच

कुत्रा चावल्यानंतर किती इंजेक्शन दिले जातात?

कुत्रा चावल्यानंतर पहिले आठ दिवस खूप महत्वाचे असतात. म्हणून, लसीचा पहिला डोस कुत्रा चावतो त्याच दिवशी घ्यावा. अशा परिस्थितीत निष्काळजी राहणे घातक ठरू शकते. यानंतर, पोटॅश किंवा डेटॉल सारखे अँटीसेप्टिक लावा. डॉक्टरांकडून अँटी-रेबीज लस घ्या. जर कुत्र्याने खोल जखम केली असेल तर इम्युनोग्लोबुलिनचे इंजेक्शन देखील द्यावे लागते.

हेही वाचा - Skin Care: एक टोमॅटो चेहऱ्यावरची लाली वाढवेल; अंघोळीआधी चेहऱ्याला 'या' पद्धतीने लावा

कुत्रा हा एक निष्ठावंत प्राणी आहे. परंतु, भटक्या कुत्र्यांमध्ये वाढलेल्या आक्रमकतेमुळे आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचे नियंत्रण नसल्यामुळे, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तथापी, हल्ली पाळीव कुत्रे देखील लोकांवर हल्ला करतानाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लहान मुले किंवा वृद्धांनी भटक्या कुत्र्यांपासून तसेच पाळीव कुत्र्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे.   

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 


सम्बन्धित सामग्री