मुंबई: वय वाढलं की आपल्याला आरोग्यासह त्वचेच्या समस्या सतावू लागतात. त्वचा सैल आणि कोरडी पडू लागते. सुरकुत्या येऊन निस्तेज दिसू लागते. अशावेळी आपण महागडे स्किन केअर वापरतो. वाढत्या वयात आरोग्यासोबत आपल्याला त्वचेची देखील काळजी घ्यायला हवी. डार्क सर्कल, सुरकुत्या दिसू नये म्हणून महागडे उत्पादने लावण्यापेक्षा आपण चेहऱ्यावर टोमँटो लावल्यास फायदा होईल.
टोमॅटो फक्त पदार्थाची चवच बदलत नाही तर आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत करते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम, एंटीऑक्सिडंट आणि सायट्रिक एसिड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा क्लिन होण्यास मदत होते. सकाळी अंघोळीपूर्वी एका टोमॅटोमध्ये चिमूटभर हळद मिसळा. जर आपली त्वचा कोरडी असेल तर त्यात थोडे मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने 2 मिनिटे मसाज करा. 5 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
हेही वाचा: PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 'या' तारखेला वितरित होणार
आपली त्वचा खूप काळी पडली असेल तर टोमॅटोच्या रसात बेसन आणि दही मिक्स करुन त्याचा फेस पॅक तयार करा. हा पॅक दोन मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. यामुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होईल. तेलकट त्वचेसाठी टोमॅटो फायदेशीर आहे. यात असणारे घटक त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. जर त्वचेवर पिंपल्स येत असतील तर त्यात कोरफडीचा गर मिक्स करुन लावा. वाढत्या वयात कोलेजन कमी होते. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. आपण रोज चेहऱ्यावर टोमॅटो लावायला हवा. ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.